बोगस टीसींवर क्यूआर कोडचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 05:52 AM2019-04-11T05:52:10+5:302019-04-11T05:52:13+5:30

रेल्वे प्रशासनाचा अनोखा प्रयोग : ठाणे रेल्वे स्थानकातून प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी

QR Code Watch on Bogus TC | बोगस टीसींवर क्यूआर कोडचा वॉच

बोगस टीसींवर क्यूआर कोडचा वॉच

googlenewsNext

ठाणे : बोगस टीसींद्वारे रेल्वे प्रवाशांची होणारी फसवणूक तसेच लूट आणि त्यातून रेल्वे प्रशासनाची होणारी बदनामी रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने अशा बोगस टीसींवर वॉच ठेवण्यासाठी ‘आयडी क्यूआरकोड’चा अनोखा पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्याची सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर ठाणे रेल्वेस्थानकात सुरुवात झाली आहे. या प्रोजेक्टमध्ये टीसींना दिलेल्या आयडीवरील क्यूआरकोड मोबाइलवर स्कॅन करताच क्षणार्धात बोगसपणा समोर येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.


मध्य रेल्वेच्या विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रॉबिन कालिया यांच्या संकल्पनेतून हे तंत्र तयार केले आहे. प्रवाशांनी आपल्या मोबाइलवरील पेटीएम, भीम अ‍ॅप वा इतर कोणत्याही ‘क्यूआर’अ‍ॅपद्वारे टीसींना दिलेला ‘क्यूआर’कोड स्कॅन करताच सर्व्हरशी कनेक्शन होऊन मोबाइलवर लिंक ओपन होईल. यामध्ये संबंधित टीसीच्या फोटोसह नाव आणि त्यांना रेल्वेकडून मिळणारा नंबर अशी सर्व माहिती मोबाइलवर दिसणार आहे. त्यातच, ठाण्यातील ज्या टीसींना हा आयडी मिळाला आहे, त्यांना तो गळ्यात घालण्याची सक्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्यात पकडला मार्चमध्ये बोगस टीसी
ठाणे रेल्वेस्थानकात आलेल्या पवन एक्स्प्रेसमध्ये अखिलेश कुमार तिवारी (२१ रा. उत्तर प्रदेश) या उच्चशिक्षित तरुणाने टीसी असल्याची बतावणी करून त्या डब्यातील प्रवाशांकडून पैसे उकळले होते. यावेळी काही जणांनी आरडाओरड केली. ती लक्षात येताच, ठाणे रेल्वेस्थानकातील मंगेश कदम आणि मनोज शहाणे या टीसींनी त्याला पकडले. ही गाडी एलटीटी येथून सुटल्याने अखिलेश याच्याविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.
ठाण्यात २१ स्टाफपैकी १७ जणांकडे आयडी
ठाणे रेल्वेस्थानकात एकूण टीसींचा २१ स्टाफ आहे. त्यातील तिघे रजेवर असून १८ पैकी १७ जणांना क्यूआरकोड आयडी दिले आहेत. त्यानुसार, ठाण्यातील टीसी हा नवा आयडी गळ्यात घालत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: QR Code Watch on Bogus TC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.