केडीएमसीची स्वेच्छानिवृत्ती योजना

By admin | Published: December 23, 2016 03:14 AM2016-12-23T03:14:53+5:302016-12-23T03:14:53+5:30

केडीएमसीत ३० वर्षे सेवा केलेले अधिकारी-कर्मचारी यांना स्वेच्छानिवृत्ती घेता येत होती. परंतु, आता २० वर्षे सेवा करणाऱ्यासही

KDMC's voluntary retirement plan | केडीएमसीची स्वेच्छानिवृत्ती योजना

केडीएमसीची स्वेच्छानिवृत्ती योजना

Next

कल्याण : केडीएमसीत ३० वर्षे सेवा केलेले अधिकारी-कर्मचारी यांना स्वेच्छानिवृत्ती घेता येत होती. परंतु, आता २० वर्षे सेवा करणाऱ्यासही स्वेच्छानिवृत्ती घेता येऊ शकते, असे परिपत्रक केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी गुरुवारी काढले. मात्र, स्वेच्छानिवृत्ती घेऊ इच्छिणाऱ्याने तीन महिन्यांची आगाऊ नोटीस देणे आवश्यक आहे. तसेच वर्ग-१ ते ४ मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी १ ते ३१ जानेवारी २०१७ या कालावधीत विनंती अर्ज करावेत, असे त्यात म्हटले आहे.
सफाई कर्मचारी म्हणून निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या अथवा स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या किंवा सेवेत असताना निधन पावलेल्या केवळ अनुसूचित जातीमधील इतर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसाने या योजनेचा लाभ घ्यावा, असे नमूद केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: KDMC's voluntary retirement plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.