कल्याण-नेवाळी विमानतळाच्या जागेचा प्रश्न पेटला

By Admin | Published: June 22, 2017 10:18 AM2017-06-22T10:18:56+5:302017-06-22T10:36:03+5:30

कल्याण-नेवाळी विमानतळाच्या जागेचा प्रश्न अधिक चिघळल्याचं दिसत आहे. नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्ती जमिनी संपादीत केल्याचे सांगत नेवाळी नाका परिसरात शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन छडले आहे.

Kalyan-Navawali airport land question raised | कल्याण-नेवाळी विमानतळाच्या जागेचा प्रश्न पेटला

कल्याण-नेवाळी विमानतळाच्या जागेचा प्रश्न पेटला

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 22 - कल्याण-नेवाळी विमानतळाच्या जागेचा प्रश्न अधिक चिघळल्याचं दिसत आहे.  नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्ती जमिनी संपादीत केल्याचे सांगत नेवाळी नाका परिसरात शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन छडले आहे.  टायर जाळून मलंगगडकडे जाणारा मुख्य रस्ता आंदोलकांनी रोखला आहे. आपल्याच मालकीच्या शेतजमिनींवर पेरणी करण्यास मज्जाव केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
 
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मलंग रोडवरील नेवाळी येथील १,६०० एकर जागा ताब्यात घेतली होती. त्यातील काही जागा शेतकऱ्यांच्या ताब्यात असून, बऱ्याच जागेवर अतिक्रमण झाले आहे. या जागेवर संरक्षण विभागाचा हक्क आहे की, स्थानिक शेतकऱ्यांचा यावरून संभ्रम आहे. या जागेच्या मालकीबाबतची कोणतीही माहिती दिली जात नाही असा आक्षेप, ग्रामस्थ घेत आहेत.
 
(नेवाळीतील शेतक-यांवर अन्याय होऊ देणार नाही - एकनाथ शिंदे)
 
काय आहे नेमके प्रकरण?
स्वातंत्र्यपूर्व भारतात १९४२ सालच्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नेवाळी येथे ब्रिटिश सैन्याने एक हजार ६५० एकर जागा संपादित करून विमानतळ उभारले होते. मात्र, ही जागा केंद्र सरकारने अजूनही शेतकऱ्यांना परत केलेली नाही. या जागेवर आता नौसेनेने ताबा घेतला आहे. तेथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. 
(नेवाळी विमानतळाची जमीन शेतक-यांना परत करता येणार नाही - राज्य सरकार)
 
१९४२ मध्ये ब्रिटिश सरकारने नेवाळी परिसरात संपादित केलेली एक हजार ६५० एकर जागा आजपासच्या १८ गावांतील शेतकऱ्यांची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने ही जागा शेतकऱ्यांना परत करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने ही जागा संरक्षण खात्याकडे वर्ग केली. संरक्षण खात्याने ही जागा नौसेनेला दिली आहे. या जागेवर नौसेनेने संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या जागा परत न करता तेथे संरक्षण भिंत उभारण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
(नेवाळी विमानतळाची जागा परत द्या)
 
नेवाळी येथे विमानतळ होणार होते. मात्र, नियोजित विमानतळ नवी मुंबई येथे होत असल्याने आता नौसेनेला ही जागा कशासाठी हवी आहे, असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 
 

Web Title: Kalyan-Navawali airport land question raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.