भिवंडीत दुचाकी व रिक्षा चोरट्यास भिवंडी गुन्हे शाखेने केली अटक, सात गुन्ह्यांची उकल 

By नितीन पंडित | Published: April 24, 2024 05:51 PM2024-04-24T17:51:31+5:302024-04-24T17:52:17+5:30

भिवंडी गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी,पोलिस किशोर थोरात,प्रकाश पाटील,अमोल इंगळे यांना एका वाहन चोरट्यांची गोपनीय माहिती मिळाली होती.

crime branch arrested two wheeler and rickshaw thief in bhiwandi solved seven cases | भिवंडीत दुचाकी व रिक्षा चोरट्यास भिवंडी गुन्हे शाखेने केली अटक, सात गुन्ह्यांची उकल 

भिवंडीत दुचाकी व रिक्षा चोरट्यास भिवंडी गुन्हे शाखेने केली अटक, सात गुन्ह्यांची उकल 

नितीन पंडित, भिवंडी: शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या असतांनाच भिवंडी गुन्हे शाखेने विशेष पथक तैनात करत एका अट्टल वाहन चोरट्यास अटक केली असून त्याच्या जवळून ४ लाख ९० हजार रुपये किमतीची वाहने जप्त करून सात गुन्ह्यांची उकल केली असल्याची माहिती गुन्हे शाखेने बुधवारी दिली आहे.

भिवंडी गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी,पोलिस किशोर थोरात,प्रकाश पाटील,अमोल इंगळे यांना एका वाहन चोरट्यांची गोपनीय माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहरातील संगम पाडा येथील एका चाळीतून इक्बाल खान उर्फ बंटया वय २२ वर्षे यास ताब्यात घेऊन त्याकडे कसून चौकशी केली असता त्याने मुंबई शहर, कल्याण,विरार व भिवंडी परिसरातून ३ रिक्षा व ४ दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. पोलिसांनी ही सर्व ४ लाख ९० हजार रुपये किमतीची वाहने जप्त करीत आरोपी इक्बाल खान उर्फ बंटया यास अटक केली आहे.

Web Title: crime branch arrested two wheeler and rickshaw thief in bhiwandi solved seven cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.