अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 07:37 AM2024-05-02T07:37:50+5:302024-05-02T07:38:09+5:30

या अहवालात देशाकडून एआय तंत्रज्ञान  स्वीकारण्याची गती,  त्यासाठी योग्य बदलांची तत्परता, आव्हाने आणि एआय सफलता प्राप्त करण्यासंबंधीचा डाटा याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

AI is used more in India than in the US; The country is at the forefront of technology adoption | अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात भारताने अमेरिका व ब्रिटन यांसारख्या बलाढ्य देशांनाही मागे टाकून आघाडी घेतली आहे, असा दावा वृत्तसंस्था ‘एएनआय’ने केलेल्या एका सर्वेक्षण अहवालात केला आहे.

या अहवालात देशाकडून एआय तंत्रज्ञान  स्वीकारण्याची गती,  त्यासाठी योग्य बदलांची तत्परता, आव्हाने आणि एआय सफलता प्राप्त करण्यासंबंधीचा डाटा याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, भारत, सिंगापूर, ब्रिटन, आणि अमेरिका हे देश एआय स्वीकारण्याच्या बाबतीत सर्वात आघाडीवर आहेत. याउलट स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांसारखे देश तांत्रिक प्रगतीत मागे पडले आहेत.

जगात एआय तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या देशातील ६७ टक्के कंपन्यांकडे हायब्रीड आयटी वातावरण आहे. भारतात हे प्रमाण सर्वाधिक ७० टक्के, तर जपानमध्ये सर्वांत कमी २४ टक्के आहे.

६०% कंपन्यांमध्ये एआय प्रकल्प सुरू

या सर्वेक्षणात जगातील प्रमुख १० देशांतील १,३०० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना सामावून घेण्यात आले होते.

अहवालानुसार, भारत, सिंगापूर, ब्रिटन आणि अमेरिका या देशांतील ६० टक्के कंपन्यांमध्ये एआय प्रकल्प सुरू आहेत अथवा पथदर्शक टप्प्यात आहेत.

याउलट स्पेन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, जर्मनी आणि जपान या देशांतील केवळ ३६ टक्के कंपन्यांनी एआयसाठी पुढाकार घेतला आहे.

Web Title: AI is used more in India than in the US; The country is at the forefront of technology adoption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.