शुक्रवार २६ मे २०१७

Menu

होम >> क्रीडा >> स्टोरी
दीपक, रवी, सत्येंद्रचे लक्ष पदकावर
First Published: 19-May-2017 : 02:52:34

म्युनिच : भारताचे अव्वल नेमबाज दीपक कुमार, रवी कुमार आणि सत्येंद्र सिंह उद्यापासून (शुक्रवार) सुरू होणाऱ्या आयसीसीएफ जागतिक रायफल व पिस्टल नेमबाजी स्पर्धेत पहिल्या दिवशी आपापल्या गटात अव्वल स्थान संपादन करून पदके जिंकण्याच्या इर्षेने खेळतील.

पुरुष गटात १० मीटर एअर रायफल प्रकारापासून या स्पर्धेची सुरुवात होईल. या स्पर्धेत ५९ देशांचे एकूण १२९ नेमबाज पहिल्या ८ क्रमांकांत आपले स्थान निश्चित करण्यासाठी अचूक लक्ष्य साधण्यासाठी प्रयत्नशील असतील. महिलांच्या गटात १० मीटर एअर रायफलमध्ये ५५ देशांच्या एकूण १२२ नेमबाज आपले कौशल्य पणाला लावतील.

या स्पर्धेत रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारणारे आठपैकी पाच नेमबाज स्वत:चे कौशल्य पणाला लावतील. यांमध्ये युक्रेनचा रौप्यपदकविजेता सेरहिय कुलिस आणि रशियाचा कांस्यपदकविजेता व्लादिमीर मासलेनिकोव्हचासुद्धा समावेश आहे.

महिला गटात या वर्षी नवी दिल्ली विश्व चषक स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेली भारताची पूजा घाटकर, आॅलिम्पियन अपूर्वी चंदेला आणि युवा नेमबाज मेघना सजनार यासुद्धा आपापल्या प्रकारात अचूक लक्ष्य साधण्याचा प्रयत्न करतील. रिओ आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेती अमेरिकेची वर्जिनिया थे्रसर आॅलिम्पिक स्पर्धेच्या विश्रांतीनंतर प्रथम स्पर्धेत सहभागी होणार आहे. पहिल्या दिवशी पुरुष गटात ५० मीटर पिस्टल स्पर्धेचा एलिमिनेशन राऊंडसुद्धा होणार आहे. यामध्ये भारताचे जितू रॉय, प्रकाश नानजप्पा आणि अमनप्रीत सिंह सहभागी होतील. जगभरातील ८० राष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे सदस्यदेशांचे ७५०हून अधिक नेमबाज या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. (वृत्तसंस्था)

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com