सोमवार २६ जून २०१७

Menu

होम >> 428 >> स्टोरी
तुमचा मोबाइलच तुमच्या मूळावर उठलाय! खोटं वाटतं? हे वाचा...
First Published: 16-June-2017 : 13:44:16

- नितांत महाजन

इज युवर सेलफोन मेकिंग यू लेस पॉप्युलर? असा प्रश्न जगभरातल्या फोन वापरकर्त्यांना विचारला तरी त्याचं उत्तर ते नाही असंच देणार आहेत. देतातही. पण ते खरं नाही. म्हणजे आपला फोनच आपला वैरी झालाय हे आपण मान्यही करणार नाही. मात्र आपल्या नकळत तसं घडतं आहे. आणि आपल्या करिअरच्याच नाही तर आपल्या जगण्याच्याच मूळावर उठलाय हे आपल्याला कळतच नाही. मात्र आपण त्याच त्या चूका परत करत राहतो, लोक आपल्याला हसतात. नाकं मुरडतात. हळूहळू टाळूही लागतात. टीका करतात आणि आपल्या कामावर यासाऱ्याचा मोठा परिणाम होतो. वाईट हेच की हे सारं असं घडतं आहे हे आपल्याला माहितीच नसतं. आपल्या चुकून कधी लक्षातही येत नाही. मात्र या काही गोष्टी पहा. आपण हमखास करतो आणि टीकेचे धनी होतो.

१) आपला फोन कुठंही वाजतो. कुठंही म्हणजे काहीजण तर आपला सेलफोन टॉयलेटमध्येही घेऊन जातात. तिथं तर तो वाजतोच, रात्री बेरात्री, थिएटरमध्ये, हॉस्पिटलध्ये, मिटिंगमध्ये, एवढंच कशाला बॉस आपल्याला झापत असताना त्याच्या केबिनमध्येही वाजतो. तसं तो वाजत असेल तर समजा, आपलं काही खरं नाही.

२) मोठमोठ्यानं बोलता तुम्ही फोनवर. इतक्या मोठ्यानं की बाकीच्यांना काम करणं अवघड होतं. इतकं अवघड होतं की तुमच्या आवाजापलिकडे काहीच घडू शकत नाही. त्यात बोलणंही अनेकदा पर्सनल. अगदी चमत्कारिक तपशिल लोकांना ऐकू जातात. आणि मग लोक त्यावर हसतात. कायमच.

 

३) ढिंकचिका ढिंकचिका पासून कोकिळेचे आवाज, कुत्र्याचे आवाज, एखादी तुतारी, लहान बाळाच्या रडण्याचा आवाज अशी जर तुमची रिंगटोन असेल तर कुणी का तुम्हाला सिरीयस्ली घ्यावं? त्यात तो फोन वाजतच असतो, आणि तुम्ही फिरता आॅफिसभर. किंवा मॉलमध्ये तुमच्या खिशातला फोन असा विचित्र वाजतो. आणि हसू होतंच तुमचं.

४) अ‍ॅँ?? ऐकू येत नाही? कायऽऽऽ? असं सारं जर तुम्ही ओरडून बोलत असाल तर आवरा स्वत:ला?

५) आॅफिशियल मिटिंगमध्ये फोन चेक करता, व्हॉट्सअ‍ॅपचवरचे जोक पाहून हसता, मेल चेक करता, कुणी तुमच्याशी बोलत असताना तुमचंं नाक फोनमध्ये असतं? लोक टाळतीलच तुम्हाला हमखास.

६) तुम्ही आॅफिसची मिटिंग म्हणून, किंवा मित्रांबरोबर बाहेर जेवायला जाता, आणि फोन टेबलवरच ठेवता? सारखा वाजला का वाजला का करुन पाहता, मग समजा की तुम्हाला मॅनर्स जरा कमीच आहेत.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com