मंगळवार २७ जून २०१७

Menu

होम >> व्यापार >> स्टोरी
लवकरच मिळणार पेट्रोल, डिझेलची होम डिलिव्हरी
First Published: 21-April-2017 : 19:48:35
Last Updated at: 21-April-2017 : 19:56:47
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21- पेट्रोल पंपावर लागणा-या लांब रांगा टाळण्याच्या हेतूने तेल मंत्रालयाने पेट्रोल, डिझेलची होम डिलिव्हरी करता येईल का यादृष्टीने विचार सुरु केला आहे. तेल मंत्रालयाने यासंबंधी ट्विट करत प्री-बूकिंग केल्यास ग्राहकांना तेल उत्पादनांची होम डिलिव्हरी करण्यासंबंधी पर्यायांचा विचार सुरु असल्याचं सांगितलं आहे. दररोज किमान 350 कोटी लोक पेट्रोल पंपांवर जात असतात. पेट्रोल पंपावर वर्षभरात किमान 2 हजार 500 कोटींची उलाढाल होत असते. 
 
'ग्राहकांनी प्री-बूकिंग केल्यास तेल उत्पादनांची होम डिलिव्हरी करण्यासासंबंधी पर्यायांचा विचार सुरु आहे. यामुळे ग्राहकांच्या वेळेची बचत होईल, सोबतच पंपांवर लांगणा-या लांब रांगाही टाळता येतील', असं ट्विट तेल मंत्रालयाने केलं आहे.
 
तेलासाठी भारत मोठी बाजारपेठ असून जगात तिस-या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार येत्या 1 मे पासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये बदल होणार आहे. आयओसी, भारत पेट्रोलियम लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड या सरकारी तेल कंपन्यांच्या मालकीचे जवळपास 58 हजार पेट्रोल पंप आहेत. येत्या 1 मे पासून निवडक पाच शहरात नियमित पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये बदल होतील.  आंध्रप्रदेशातील पुदूच्चेरी, विझाग, राजस्थानमधील उदयपूर, झारखंडमध्ये जमशेदपूर आणि चंदीगड या पाच शहरात प्रायोगिक तत्वावर दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा आढावा घेतला जाईल.  
 
सध्या तेल कंपन्या दरमहिन्यात 1 आणि 16 तारखेला पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा आढावा घेतात. जून 2010 मध्ये सरकारने पेट्रोलच्या किंमती नियंत्रण मुक्त केल्या आणि किंमती ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना दिला. ऑक्टोबर 2014 पासून डिझेलचे दर ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना मिळाला. 
 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com