सोमवार २६ जून २०१७

Menu

होम >> व्यापार >> स्टोरी
सेन्सेक्स १३0 अंकांनी घसरला
First Published: 21-March-2017 : 00:43:55

मुंबई : सोमवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३0.२५ अंकांनी अथवा 0.४४ टक्क्यांनी घसरून २९,५१८.७४ अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३३.२0 अंकांनी अथवा 0.३६ टक्क्यांनी घसरून ९,१२६.८५ अंकांवर बंद झाला. नफावसुलीचा फटका बाजारांना बसल्याचे सूत्रांनी सांगितले. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी अ‍ॅक्सिस बँकेचा समभाग सर्वाधिक २.४१ टक्क्यांनी घसरला. त्या खालोखाल आयसीआयसीआय बँकेचा समभाग १.९९ टक्क्यांनी घसरला. घसरण सोसावी लागलेल्या अन्य कंपन्यांत इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, आरआयएल, टाटा स्टील, एलअँडटी, हिंद युनिलिव्हर, पॉवरग्रीड, मारुती सुझुकी आणि एमअँडएम यांचा समावेश आहे.

एनटीपीसी, कोल इंडिया, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, लुपीन, एचडीएफसी लि., ओएनजीसी, गेल आणि एशियन पेंट यांचे समभाग 0.८७ टक्क्यांपर्यंत वाढले. त्यामुळे सेन्सेक्सची घसरण मर्यादित राहिली.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com