सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
जगण्याचं उघडवाघडं माहितीपत्रक, ते पाहिलंय का तुम्ही?
First Published: 12-July-2017 : 15:50:42

 - प्रज्ञा शिदोरे

माणसानं आयुष्य कसं जगावं, समाजातील नीती-नियम काय असावेत याबद्दल आपल्याला लहानपणापासून काही गोष्टी शिकवल्या जातात. आपला धर्म हा आपले हे नीती-नियम ठरवण्यात फार महत्त्वाची भूमिका बजावतो. आज धार्मिक विद्वेषाच्या आणि दहशतवादाच्या जगात असताना थोडक्यातच पण खूप काही सांगून जाणारा हा लघुपट नक्की बघाच..!
 
कोणत्याही परिवर्तनाला घाबरून असणारा पांढरपेशा समाज, बदलाला विरोध करणारे पारंपरिक विचारसरणीचे लोक, हे वागणं बरोबर ते वागणं चूक असं काहीतरी ठरवल्यानं व्यक्तिगत आयुष्यात काहीतरी गमावणं, वेगळं काहीतरी करणाऱ्यांबद्दल पांढरपेशा समाजाला असलेली अढी अशा विविध गोष्टी दाखवत हा लघुपट फार सुंदरपणे पुढे सरकतो.
 
अखेर मात्र लघुपटाचा छोटा नायक निर्धाराने बदल करतो आणि जगाला तोंड देतो. त्याच्या लक्षात येतं की असे बदल करणाऱ्या मंडळींनी जग किती सुंदर आणि वैविध्यपूर्ण करून ठेवलं आहे!
सुंदर एनिमेशन, कपाट व ड्रॉवर यांचा अत्यंत प्रभावी प्रतीकात्मक उपयोग यामुळे हा लघुपट वेगळीच उंची गाठतो. थेरामीन ट्रीज आणि क्वलिया सूप दोन भावांनी मिळून या अप्रतिम लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.
नक्की बघा ८ मिनिटांचा लघुपट ‘आयुष्याचं मॅन्युएल’ अर्थात- इन्स्ट्रक्शन मॅन्युअल फॉर लाइफ. http://www.filmsforaction.org/watch/instruction-manual-for-life/
( pradnya.shidore@gmail.com )
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com