सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
हे करतात कसं?
First Published: 12-July-2017 : 15:48:18

 - प्रज्ञा शिदोरे

लिफ्टचा शोध कोणी लावला? इंटरनेट कोणी तयार केलं? मशीन्स बनतात कशी? पेटंट म्हणजे काय? पहिली बंदूक कोणी आणि कधी बनवली? असे शेकडो प्रश्न तुम्हाला पडतात? मग कधी विचार केला आहे का त्यावर? 

रोजच्या जीवनात शेकडो गोष्टी आपण वापरत असतो. पण त्या वापरत असताना त्या बनल्या कशा, कोणी पहिल्यांदा बनवल्या असे प्रश्न आपल्याला पडतात? पण मग या गोष्टींची नेमकी आणि विश्वासार्ह माहिती कुठे मिळणार? त्यासाठीच आहे ‘हाऊ स्टफ वर्क्स’ ही वेबसाइट! इथे तुम्ही अक्षरश: फाऊंटन पेन कसं काम करते यापासून न्यूक्लीअर मिसाईल नक्की कशी तयार होते इथपर्यंत गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल.

मार्शल ब्रेन नावाच्या एका प्रोफेसरने १९९८ मध्ये या वेबसाइटची सुरुवात केली. असंख्य विषयांवर अतिशय सोप्या भाषेत माहिती द्यायला सुरु वात केली. या वेबसाइटवर मोडलेल्या व्हॅक्यूम क्लीनरचे काय करावे इथपासून गोल्फचा इतिहास काय, ‘एप्रिल फूल’ मागे काय इतिहास आहे अशा अक्षरश: कोणत्याही विषयावर माहिती उपलब्ध आहे.

टाइम या जगप्रसिद्ध मासिकाने २००६-०७ अशी सलग दोन वर्षे जगातील सर्वोत्तम २५ वेबसाइट्समध्ये हाऊ स्टफ वर्क्स या वेबसाइटचा समावेश केला होता. ‘डिस्कव्हरी कम्युनिकेशन’ ने या वेबसाइटचे हक्क २००३ मध्ये विकत घेतल्यापासून या वेबसाइटची विश्वासार्हता अधिकच वाढली. या वेबसाइटला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. जगभरचे सर्व वयोगटातले लाखो लोक नित्यनेमाने ही वेबसाइट बघतात आणि त्यावरच्या माहितीचा लाभ घेतात. तुम्हाला तुमचे शालेय प्रकल्प, कॉलेजमध्ये काही विषयांवर साधा अभ्यास करायचा असेल किंवा अगदी साधं म्हणजे तुम्हाला तुमच्या मित्रांसमोर जरा माज करायचा असेल तर ही वेबसाइट पाहत जा.

ही वेबसाइट म्हणजे माहितीचा हवा तितका खजिना असलेली अलिबाबाची गुहा आहे. मुख्य म्हणजे हा खजिना सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे !

नक्की पहा-http://www.howstuffworks.com/

 

(pradnya.shidore@gmail.com )

 

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com