शुक्रवार २३ जून २०१७

Menu

होम >> ऑक्सिजन >> स्टोरी
झुलन
First Published: 17-May-2017 : 15:37:47
 
आयपीएलचा झगमगाट आणि जस्टीन बीबरच्या मुंबईवारीत भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामीची कामगिरी अक्षरश: वाहून गेली. पण भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीने जबरदस्त कामगिरी करताना आंतरराष्ट्रीय वन डे मध्ये जगात सर्वाधिक बळी मिळण्याची अफलातून कामगिरी केली. 
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात तिनं भारतीय संघाला विजय तर मिळवून दिलाच, पण आपल्या वैयक्तिक कामगिरीचंही शिखर गाठलं. ३४ वर्षीय झुलननं १५३ व्या वन डे सामन्यात १८१ बळी मिळवून हा विक्रम आपल्या नावे केला. भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपदही भूषवलेल्या झुलन गोस्वामीच्या जोरावर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेटचा संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर भरीव कामगिरी करीत आहे.
तब्बल १६ वर्षांपासून भारतीय क्रिकेटची धुरा एकहाती आपल्या शिरावर सांभाळणारी झुलन अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र ही उंची गाठताना अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना तिला करावा लागला. हा प्रवास कधीच सोपा नव्हता. परिस्थितीनं तर कधीच हात दिला नाही. पण तिनं आपली जिद्दही कधीच सोडली नाही. घरी खाण्यापिण्याचेही वांदे असतानाही तिनं आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली. 
तिच्याविषयीच्या या सात गोष्टी तिचा संघर्ष सांगण्यासाठी पुरेशा आहेत. 
१. नादिया एक्स्प्रेस म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरही झुलनची ख्याती आहे. चेेंडूला उंची देण्याची कला अवगत आहे. 
२. गरिबीत लहानपण गेलेल्या झुलनला मुलांसोबत क्रिकेट खेळावं लागलं. पण त्यामुळे तिच्या क्षमतेत वाढही झाली.
३. सुरुवातीला अतिशय हळू बॉलिंग टाकत असल्यामुळे तिची खूपदा खिल्लीही उडवली गेली आणि ती टिंगलटवाळीचा विषय झाली होती. पण त्यातूनच तिला प्रेरणा मिळाली आणि ती पेटून उठली. मुलांपेक्षाही वेगात आणि अचूक टप्प्यावर बॉलिंग करू लागली. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर तेज गोलंदाज म्हणून तिची ख्याती आहे. 
४. झुलनला क्रिकेटची प्रॅक्टिस करण्यासाठीही खूप आटापिटा करावा लागला. पहाटे चार वाजता उठून ट्रेननं नादियाहून दक्षिण कोलकातामधील विवेकानंद पार्क येथे ती प्रॅक्टिसासाठी यायची. 
५. एक दिवस क्रिकेट खेळून घरी परतायला रात्री उशीर झाला म्हणून तिच्या आईनं तिला कित्येक तास घराबाहेरच ठेवलं होतं. 
- मयूर पठाडे
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com