शुक्रवार २६ मे २०१७

Menu

होम >> आंतरराष्ट्रीय >> स्टोरी
कुलभूषण जाधवप्रकरणी पाकची आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका
First Published: 19-May-2017 : 22:59:24
Last Updated at: 20-May-2017 : 02:18:01

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 19 - आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधवांच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर पाकने याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. कुलभूषण जाधवप्रकरणी सहा आठवड्यांत पुन्हा सुनावणी घ्या, असे या याचिकेत पाकने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्याचे आदेश पाकिस्तानला दिले आहेत.  मात्र,  आता याप्रकरणी पाकिस्तानने याचिका दाखल केल्याचे वृत्त पाकिस्तानमधील एका वेबसाइटने दिले आहे.

हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाला पाकिस्तान पुन्हा आव्हान देणार असून, पाकिस्तानकडून  पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे, असे वृत्त येथील एका वेबसाइटने दिले आहे. दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात अ‍ॅड.खवर कुरेशी पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत, तर कुलभूषण जाधव त्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात शनिवारपर्यंत अपील करू शकतात, असेही या वेबसाइटने म्हटले आहे.

पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने 10 एप्रिल रोजी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली. भारतीय गुप्तहेर यंत्रणा रॉसाठी हेरगिरी केल्याचा आरोप पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर ठेवला आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!



महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com