शनिवार २४ जून २०१७

Menu

होम >> आंतरराष्ट्रीय >> स्टोरी
पनामा प्रकरणी कोर्ट ठरवणार नवाज किती 'शरीफ'?
First Published: 20-April-2017 : 14:23:25
Last Updated at: 20-April-2017 : 15:52:35

 ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. 20- बहुचर्चित पनामा पेपर लिक प्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या दोन्ही मुलांना संयुक्त तपास टीमसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पाच न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. यापैकी तीन न्यायाधीशांनी पुढील तपास गरजेचा असल्याचं मत नोंदवलं, दोन न्यायाधीशांनी नवाज शरीफांना अपात्र ठरवलं.
 
पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय आज पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधातील पनामा गेट प्रकरणात निकाल सुनावला. या निकालानंतर पाकिस्तानात  राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय खंडपीठ यासंबंधी निकाल दिला. संयुक्त तपास टीमला या प्रकरणाची 60 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.  
 

पनामा पेपर लीक प्रकरण 1990च्या दशकात शरीफ यांनी लंडनमध्ये घर खरेदी केल्यानंतर उघडकीस आलं होतं. शरीफ यांनी त्यावेळी दोनदा पाकिस्तानचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाचे प्रमुख न्यायाधीश असिफ सईद खोसा यांनी या प्रकरणी सुनावणी केली. पनामा प्रकरण हे नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलांशी संबंधित आहे. त्यामुळे सत्तारूढ असलेल्या पीएमएल-एन पार्टीमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. एक गट निवडणूक लवकर घेण्याचा सल्ला देत आहे. तर दुसरा गट निकालानंतरच्या रणनीतीच्या मुद्द्यावर विचार करत असून, पक्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणुका घेण्याकडे त्यांचा व्होरा आहे. 

 
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com