सोमवार २४ जुलै २०१७

Menu

होम >> महाराष्ट्र >> स्टोरी
रायगडमध्ये संततधार पाऊस, अंबा नदीने गाठली धाेक्याची पातळी
First Published: 17-July-2017 : 19:30:25
Last Updated at: 17-July-2017 : 21:41:08

जयंत धुळप, ऑनलाइन लोकमत

रायगड, दि. 17 -  रायगड जिल्ह्यात सोमवार सकाळ पासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे संध्याकाळी 6.30 वाजता अंबा नदीने नागोठणे येथे धोक्याची पातळी ओलांडली आहे. अंबा नदिची धोकादायक पूर पातळी 8 मिटर असून सद्यस्थितीत जलपातळी 8 मिटरला पोहोचली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

दरम्यान कुंडलिका नदिची धोकादायक पूर पातळी डोलवहाळ(रोहा) येथे 23.95 मिटर असून सद्यस्थितीत तेथे जलपातळी 23.80 मिटर झाली आहे. सावित्री नदिची पूर पातळी 6.50 मीटर असून सद्यस्थितीत जलपातळी 5.90 िमटर आहे.

येत्या 48 तासात जिल्ह्यात अतिवृष्टीचा ईषारा हवामान खात्याने दिला असल्याने सर्व नदी किनाऱ्याच्या गावांमध्ये सतर्कतेचा ईशारा दिला असून आपत्कालीन सहाय्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!



महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com