शनिवार २४ जून २०१७

Menu

होम >> महाराष्ट्र >> स्टोरी
एक नगरपरिषद, 3 नगरपंचायती व धारणी पंचायत समितीसाठी 24 मे रोजी मतदान
First Published: 21-April-2017 : 19:47:20
ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21 - नवनिर्मित नागभीड (जि. चंद्रपूर) नगरपरिषद अध्यक्ष व सदस्य पदांबरोबरच नेवासा (जि. अहमदनगर), रेणापूर (जि. लातूर) व शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच विविध 18 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांबरोबरच धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील 24 मे रोजी मतदान घेण्यात येईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

 सहारिया यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नगरपरिषदा  व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 28 एप्रिल ते 5 मे या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 मे रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 11 मेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाच्या निर्णयापासून तीन दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 24 मे  रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 26 मे  रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
जिल्हानिहाय नगरपरिषद व नगरपंचायतींच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुका 

पालघर: जव्हार- 1 क, 3 ब, 4अ, 4 ब व 4 इ, रायगड: मुरुड जंजिरा- 7 अ आणि श्रीवर्धन- 6 अ, रत्नागिरी: चिपळूण- 9 अ, सिंधुदुर्ग: कसई दोडामार्ग- 7, सातारा: मेढा- 3, सोलापूर: दुधनी- 2 अ, नाशिक: देवळा- 14, जळगाव: यावल- 1 ब, नंदुरबार: धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु.- 11, नंदुरबार- 2 क, उस्मानाबाद: उस्मानाबाद- 11 ब, लातूर: औसा- 10 अ आणि अमरावती: अचलपूर- 19 ब.

   ‘धारणी’चा निवडणूक कार्यक्रम
धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 4 मे ते 9 मे या कालावधीत नामनिर्देनपत्रे दाखल करता येतील. 11 मे रोजी नामनिर्देनपत्रांची छाननी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे 14 मेपर्यंत अपील करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 16 मे  हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक असेल. अपील असलेल्या ठिकाणी 19 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान केंद्रांची यादी 18 मे रोजी प्रसिद्ध केली जाईल. 24 मे रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची मुदत असेल. 26 मे रोजी मतमोजणी होईल.  
प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS


 
वर
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
For advertising with us e-mail to onlineads@lokmat.com