मोठी बातमी; सोलापूरचे तापमान पोहोचले ४४ अंश सेल्सिअसवर

By Appasaheb.patil | Published: April 30, 2024 06:06 PM2024-04-30T18:06:18+5:302024-04-30T18:07:41+5:30

मंगळवारी नोंदले गेलेल्या तापमानाची नोंद यंदाच्या वर्षातील उच्चांकी ठरली आहे.

solapur temperature reached 44 degrees celsius | मोठी बातमी; सोलापूरचे तापमान पोहोचले ४४ अंश सेल्सिअसवर

मोठी बातमी; सोलापूरचे तापमान पोहोचले ४४ अंश सेल्सिअसवर

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोलापूर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात असह्य़ वाढ होऊन ते आज मंगळवारी या वर्षातील सर्वाधिक तापमान ४४ अंशांच्या घरात गेले आहे. मंगळवारी नोंदले गेलेल्या तापमानाची नोंद यंदाच्या वर्षातील उच्चांकी ठरली आहे.

दरम्यान, शुक्रवार ५ एप्रिल रोजी या हंगामातील ४३.१ अंश इतके सर्वाधिक तापमान होते. या वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरश: हैराण झाले आहेत. सकाळी नऊपासूनच उकाडा जाणवत असून यात आबालवृद्धांना अधिक त्रास होत आहे.  बुधवारी २४ एप्रिल रोजी ४१.२, गुरुवारी ४१.१, शुक्रवारी ४१.२ तर शनिवारी, २७ एप्रिल रोजी ४२ अंशांच्या घरात गेले होते. रविवारी शहराचे तापमान यंदाच्या ४३.७ अंश सेल्सियस नोंदले होते. मात्र मंगळवारी तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचला. गेल्या महिन्यात १६ मार्च रोजी ४०.२ एवढे तापमान होते तर २६ मार्च रोजी ४१.४ सर्वाधिक तापमान नोंदले गेले होते.

असह्य़ तापमानामुळे सकाळी आठ वाजल्यापासूनच अंगाला चटके बसू लागल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरून फिरणे टाळले आहे. तर दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्त्यावरची वाहतूक रोडावली आहे. अंगावर चटके बसू लागल्यामुळे हैराण झालेले नागरिक उन्हात कामे करणे टाळत आहेत. ऊन तथा उष्म्यापासून सुटका होण्यासाठी थंडपेयांचा आधार महत्त्वाचा वाटू लागला आहे.

Web Title: solapur temperature reached 44 degrees celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.