सोलापुरात उष्णतेची लाट; तापमानाचा पारा पोहोचला ४४.४ अंश सेल्सिअसवर

By Appasaheb.patil | Published: May 5, 2024 10:23 PM2024-05-05T22:23:29+5:302024-05-05T22:23:43+5:30

वाढत्या तापमानामुळं उकाड्यानं सोलापूरकर हैराण झाले आहेत.

Heat wave in Solapur The temperature reached 44.4 degrees Celsius | सोलापुरात उष्णतेची लाट; तापमानाचा पारा पोहोचला ४४.४ अंश सेल्सिअसवर

सोलापुरात उष्णतेची लाट; तापमानाचा पारा पोहोचला ४४.४ अंश सेल्सिअसवर

सोलापूर : राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असून. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोलापूरसह राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. रविवारी ५ मे २०२४ रोजी सोलापूरात ४४.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद सोलापुरात झाली आहे. वाढत्या तापमानामुळं उकाड्यानं सोलापूर हैराण झाले आहेत.

दरम्यान,  सोमवारी ३० एप्रिल रोजी सोलापूरचे तापमान सर्वाधिक म्हणजे ४४ अंश सेल्सिअस इतके होते. रविवारी सोलापूरकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता. सोलापुरातही रविवारी कमाल तापमानाचा पारा ४३.७ अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली होती. सोलापुरात सलग दोन दिवस ४४ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असल्याने एप्रिलमधील उष्णतेची ही दुसरी लाट होती. गेल्या १३ ते १४ दिवसापासून सोलापूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर आहे. मे महिन्यातही असेच वातावरण असू शकेल, असाही अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. मागील आठवउ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्याने तापमानात घट झाली होती. मात्र पुन्हा तापमानाचा पारा उंचावत गेला.

Web Title: Heat wave in Solapur The temperature reached 44.4 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.