मलकापूरात सातारा-कोल्हापूर लेनवर नऊतास वाहतूक कोंडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 02:48 PM2024-05-01T14:48:41+5:302024-05-01T14:49:26+5:30

कंटेनर पलटी झाल्याने चार किलोमीटर रांगा, महाराष्ट्र दिनादिवशीच वाहनधारकांना फटका

Nine-hour traffic jam on Satara-Kolhapur lane in Malkapur! | मलकापूरात सातारा-कोल्हापूर लेनवर नऊतास वाहतूक कोंडी!

मलकापूरात सातारा-कोल्हापूर लेनवर नऊतास वाहतूक कोंडी!

मलकापूर : सहापदरीकरणासाठी मलकापूरात केलेल्या बॅरिकेटींगमुळे  वाहतूककोंडी होत असते. मात्र सातारा कोल्हापूर लेनवर कंटेनर पलटी झाल्याने चार किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जॅम झाले होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर येथील गंधर्व हॉटेलजवळ बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पलटी झालेला कंटेनर रस्त्यावरच असल्यामुळे नऊतास वाहतूककोंडी झालो होती. मलकापूरात महाराष्ट्र दिनानिमित्त बाहेर पडलेल्यांची सकाळ वाहतूक कोंडीतच गेली. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत होती. 

कराडसह मलकापूर शहरांमध्ये तालुक्यातून व महामार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मलकापूरात वाहनांसह प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी बॅरिकेटिंग केल्यामुळे दोन्हीही लेनवरील वाहतूक उपमार्गावरून वळवलेली आहे. या ठिकाणी ऊड्डानपूलाच्या कामामुळे गर्दीतून मार्ग काढत उपमार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेवूनच प्रवास करावा लागत आहे. 

बुधवारी पहाटे पूर्वेकडील उपमार्गावरील सातारा-कोल्हापूर लेनवर कंटेनर पलटी झाल्याने ट्रॅफिक जॅम झाले होते. रस्ता अरूंद आणि वाहनांची वरदळ व त्यातच कंटेनर पलटी झाल्याने मलकापूरात वाहातूक कोंडी होऊन या लेनवर चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तर आज महाराष्ट्र दिनासाठी बाहेर पडलेल्यांना वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला. कोल्हापूरनाका ते मलकापूरफाटा परिसरात वाहतूक वळवलेल्या ठिकाणची वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागत होती. 

शेवटी सकाळी ११ वाजता डीपी जैनच्या तीन क्रेन लावून कंटेनर  बाजूला करून रस्ता सुरळीत केला. यावेळी डीपी जैन चे प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र सिंग वर्मा, नागेश्वर राव, संजय पटेल, पोलीस कर्मचारी अश्विनी सूर्यवंशी, सोनम पाटील, डीपी जैन चे कर्मचारी दस्तगीर आगा, संभाजी घुटुगडे, जगनाथ थोरात, सुनील थोरात, अभिषेक व सोनू गुप्ता यांच्यासह हायवे पेट्रोलिंग टीम तसेच आप्पासाहेब खबाले, आदिनाथ भोसले त्या ठिकाणी येऊन गाडी काढण्यास मदत केली.

ट्रॅफिकचा रूग्णवाहिकेलाही फटका 
उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यापासून कांही कामानिमित्त उपमार्गावरून जायचे म्हटले की अंगावर काटाच उभा राहतो. अशी भावना स्थानिक नागरिकांची झाली आहे. बुधवारी पहाटे कंटेनर पलटी झाल्याने पहाटेपासूनच महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या ट्रॕफिकमध्ये कांही रूग्णवाहिकाही अडकून पडल्या होत्या.
 

Web Title: Nine-hour traffic jam on Satara-Kolhapur lane in Malkapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.