कारगिलमधील हौतात्म्य पंधरा वर्षांत विस्मृतीत

By admin | Published: September 22, 2014 10:17 PM2014-09-22T22:17:58+5:302014-09-23T00:12:09+5:30

ललगुण : स्मारकाचे काम रखडले; पूर्णत्वास नेण्याचे ग्रामस्थांची मागणी

Kargil martyrdom disappeared within fifteen years | कारगिलमधील हौतात्म्य पंधरा वर्षांत विस्मृतीत

कारगिलमधील हौतात्म्य पंधरा वर्षांत विस्मृतीत

Next

बुध : भारत भूमीच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची बाजी लावणारे ललगुणचे सुपुत्र हुतात्मा कृष्णात घाडगे यांच्या स्मारकाचे काम पंधरा वर्षे झाली तरी अपूर्णच आहे. पंधरा वर्षांत केवळ चौथराच बांधण्यात आला असून, हे काम केव्हा मार्गी लागणार?, असा सवाल ग्रामस्थांतून केला जात आहे.
कृष्णात घाडगे पंधरा वर्षांपूर्वी कारगिल युद्धात हुतात्मा झाले. त्यांच्या बलिदानातून भावी पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी ललगुण, ता. खटाव येथे स्मारक बनविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र पंधरा वर्षांपूर्वी करण्यात आलेले हे काम आजमितीस पूर्णत्वास गेले नाही. पंधरा वर्षांमध्ये स्मारकाचा केवळ चौथराच बांधण्यात आला आहे.
स्मारक करायचेच नव्हते, तर हुतात्म्याचा अवमान कशासाठी? असा सवाल ललगुण व परिसरातील गामस्थांतून केला जात आहे. भावी पिढीला या स्मारकापासून प्रेरणा मिळावी, यासाठी स्मारकाचे काम तत्काळ मार्गी लावावे, अशी अपेक्षा ग्रामस्थातून होत आहे. (वार्ताहर)

बलिदान  विस्मरणात जाणार?
हुतात्मा कृष्णात घाडगे यांच्या पराक्रमाची आठवण या स्मारकाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना होणार होती. या स्मारकाकडे पाहून तमाम तरुण व देशभक्त नागरिकांचा उर अभिमानाने खुलला असता; पण आज हे रखडलेले काम पाहून या देशवीर शहीदच्या बलिदान विस्मरणात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ललगुणचा सुपुत्र देशासाठी हुतात्मा झाला, ही बाब अभिनास्पद आहे. हुतात्मा कृष्णात घाडगे यांचे स्मारक पूर्ण झाल्यास यापासून अन्य युवकास प्रेरणा मिळेल. हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करून देशभक्ताला न्याय मिळावा हीच अपेक्षा.
- शंकर खापे
(माजी सैनिक, बुध)

हुतात्मा कृष्णात घाडगे माझे बंधू असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या स्मारकाचे काम अपूर्ण असल्याची खंत आहे. देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या कृष्णात घाडगे यांचे स्मारक लवकरच उभे करणार आहे .
- मानाजी घाडगे
(माजी जिल्हा परिषद सदस्य)

Web Title: Kargil martyrdom disappeared within fifteen years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.