लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपथ 

By नितीन काळेल | Published: May 2, 2024 06:34 PM2024-05-02T18:34:44+5:302024-05-02T18:35:09+5:30

जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज : ४६५ बसेस अन् दोन बोटही उपलब्ध 

Administration ready for Satara Lok Sabha election polling | लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपथ 

लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपथ 

सातारा : सातारा लोकसभा निवडणूक मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी मतदानयंत्रेही सुस्थितीत तयार करुन ठेवण्यात आली आहेत. तर या निवडणुकीसाठी ११ हजार १५५ मनुष्यबळ नियुक्त केले आहे. त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दोनवेळा देण्यात आले आहे. तसेच मतदान कर्मचाऱ्यांसाठी ४६५ बसेस आणि दोन बोटही उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मंगळवार, दि. ७ मे रोजी होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा लोकसभा अंतर्गत विधानसभेच्या सहा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाकडून ५ हजार ६५४ बॅलेट युनिट, ३ हजार ३३९ कंट्रोल युनिट व ३ हजार ४३१ व्हीव्हीपॅट प्राप्त झाले आहेत. यांची मतदानासाठी कमिशनिंगही झाली आहे. त्यामुळे सर्व मतदान यंत्रे मतदानासाठी सुस्थितीत तयार आहेत.

या निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मिनी बस ३९, एसटी ४२६ देण्यात येणार आहेत. तर दुर्गम मतदान केंद्रासाठी दोन बोट देण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीमध्ये आवश्यक असणारे सर्व साहित्य विविध शासकीय मुद्रणालयांकडून प्राप्त झालेले आहे. दुर्गम ३१ मतदान केंद्राच्या ठिकाणी संपर्क होण्यासाठी वॉकीटॉकी आणि रनर या मार्गाने संपर्क करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.


लोकसभा निवडणूक कामकाजासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या अनुषंगाने ११ हजार १५५ इतके मनुष्यबळ निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना इव्हीएम मशिन हाताळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच निवडणूक कामकाजाबाबत आवश्यक ते सर्व प्रशिक्षण दोनवेळा देण्यात आले असून तिसरे प्रशिक्षण ६ मे रोजी प्रस्तावित आहे. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

Web Title: Administration ready for Satara Lok Sabha election polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.