Sangli: तासगावमधील प्रसिद्ध उद्योजक संभाजी चव्हाण अपघातात ठार

By संतोष भिसे | Published: April 27, 2024 05:28 PM2024-04-27T17:28:50+5:302024-04-27T17:29:59+5:30

जत-तासगाव रस्त्यावर मोटारीचा अपघात

entrepreneur Sambhaji Chavan in Tasgaon, was killed in an accident | Sangli: तासगावमधील प्रसिद्ध उद्योजक संभाजी चव्हाण अपघातात ठार

Sangli: तासगावमधील प्रसिद्ध उद्योजक संभाजी चव्हाण अपघातात ठार

तासगाव : सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथील प्रसिद्ध उद्योजक, युएसके ॲग्रोचे संचालक संभाजी चव्हाण (वय ५२) हे शनिवारी दुपारी भीषण अपघातात ठार झाले. जत येथून सिद्धेवाडी या मूळ गावी यात्रेसाठी येत असताना कुंभारवाडीजवळ (ता. कवठेमहांकाळ) त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात ते जागीच ठार झाले. 

चव्हाण हे व्यावसायिक कामासाठी सकाळी जतला गेले होते. सिद्धेवाडी येथे आज यात्रा असल्याने दुपारी मोटारीतून गावाकडे परतत होते. कुंभारवाडीजवळ आले असता, त्यांचा मोटारीवरील ताबा सुटला. समोरून येणाऱ्या गाडीला जोराची धडक बसली. त्यांच्या मोटारीचेही मोठे नुकसान झाले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

चव्हाण यांनी युएसके ॲग्रो या फर्मच्या माध्यमातून उद्योगामध्ये बस्तान बसविले होते. दर्जेदार कृषी औषधांची उपलब्धता या कंपनीच्या माध्यमातून  करायचे. त्यांच्या अपघाताची बातमी समजताच तासगाव तालुक्यातून मोठ्या संख्येने लोक अपघातस्थळी धावले. कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

Web Title: entrepreneur Sambhaji Chavan in Tasgaon, was killed in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.