शुभमंगल ‘सावधान!’ लग्नसराईला 53 दिवसांचा ब्रेक; २९ जूनपर्यंत मुहूर्त नाही

By निखिल म्हात्रे | Published: May 10, 2024 12:16 PM2024-05-10T12:16:26+5:302024-05-10T12:16:42+5:30

कोणतेही मंगलकार्य असो त्याला मुहूर्त फार महत्त्वाचा असतो. त्यात लग्नसोहळ्यात मुहूर्त कटाक्षाने पाळण्यावर वधू-वर मंडळींचा भर असतो.

There is no time for marriage until June 29 | शुभमंगल ‘सावधान!’ लग्नसराईला 53 दिवसांचा ब्रेक; २९ जूनपर्यंत मुहूर्त नाही

शुभमंगल ‘सावधान!’ लग्नसराईला 53 दिवसांचा ब्रेक; २९ जूनपर्यंत मुहूर्त नाही

अलिबाग : कोणतेही मंगलकार्य असो त्याला मुहूर्त फार महत्त्वाचा असतो. त्यात लग्नसोहळ्यात मुहूर्त कटाक्षाने पाळण्यावर वधू-वर मंडळींचा भर असतो. एप्रिल महिन्यात अनेकांनी लग्नकार्य पार पाडले मात्र मे आणि जून महिन्यात दोनच मुहूर्त आहेत. २९ जूनपर्यंत मुहूर्त नाही. त्यामुळे लग्नसराईला 53 दिवसांचा ब्रेक लागणार आहे.

२ मे २०२४ या तिथीनंतर सरासरी दोन महिने विवाह मुहूर्त नाहीत. त्यामुळे नेमके जुळवण्यात आलेल्या विवाहातील वधू-वरांची ओढाताण होत आहे. २ मे ते २९ जून रोजी दरम्यान लग्न मुहूर्त नाहीत. तर काही पंचांगात मात्र धर्मग्रंथाचा आधार घेत अडचणीच्या प्रसंगी गुरू, शुक्र अस्तामध्येसुद्धा विवाहास मुभा दिली असल्याचे सांगितले आहे.

२ मेनंतर गुरू व शुक्र अस्त असल्याचे विवाह मुहूर्त नाहीत. धर्मशास्त्र गुरू, शुक्र अस्त काळात मुहूर्त मान्य नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळे अडचण येऊ शकते; परंतु काही अपवादात्मक, आपत्कालीन परिस्थितीवर विवाहासाठी परवानगीही देण्यात आली आहे.
- राहुल वाड, पंचांग अभ्यासक.

आता जुलै, नोव्हेंबरमध्ये विवाह

जुलै - ९, ११, १४, १५
नोव्हेंबर - २२, २३, २५, २६, २७.

Web Title: There is no time for marriage until June 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.