Pune: शिक्रापूर येथे पोलिसाला शिवीगाळ, दमदाटी करत खुर्चीने मारहाण; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 02:53 PM2024-04-29T14:53:33+5:302024-04-29T14:54:09+5:30

दमदाटी करत खुर्चीने मारहाण केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे सोमेश्वर आनंद वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला...

policeman was abused, forcefully beaten with a chair in Shikrapur; Filed a case | Pune: शिक्रापूर येथे पोलिसाला शिवीगाळ, दमदाटी करत खुर्चीने मारहाण; गुन्हा दाखल

Pune: शिक्रापूर येथे पोलिसाला शिवीगाळ, दमदाटी करत खुर्चीने मारहाण; गुन्हा दाखल

शिक्रापूर (पुणे) : येथील पाबळ चौकाजवळ वाहतूक पोलिसाने एकाला दुचाकीला नंबरप्लेट का नाही, वाहन चालवण्याबाबत परवाना आहे का, असे विचारत पोलिस स्टेशनमध्ये आणल्याच्या रागातून दुचाकी चालकाने पोलिसाला शिवीगाळ, दमदाटी करत खुर्चीने मारहाण केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे सोमेश्वर आनंद वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई ज्ञानदेव गोरे हे २८ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास पाबळ चौक परिसरात वाहतूक नियमनाचे काम करत असताना एमएच १२ बीएस ६७४६ या दुचाकीहून एक इसम आला. गोरेंना दुचाकीचा धक्का लागला. दरम्यान, दुचाकी चालकाला तुझ्या दुचाकीला नंबर का नाही, दुचाकी चालवण्याचा परवाना आहे का, असे विचारले असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तर तू माझ्याशी वाद घालू नको, पोलिस स्टेशनला चल, असे म्हणून गोरेंनी त्या दुचाकीचालकाला पोलिस स्टेशनमध्ये नेले. आणि गोरे पुन्हा वाहतूक नियमनाच्या कामासाठी बाहेर आले.

यावेळी पाठीमागून दुचाकीचालक सोमेश्वर वाघ आला आणि शेजारील हॉटेलमधील खुर्ची घेऊन मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी हॉटेलचालक अशोक तकते यांनी सदर इसमाला पकडले आणि पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये आणले. याबाबत पोलिस शिपाई ज्ञानदेव दत्तात्रय गोरे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सोमेश्वर आनंद वाघ (वय ४६, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे) या दुचाकी चालकावर शिवीगाळ, दमदाटी, मारहाण, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करत आहेत.

Web Title: policeman was abused, forcefully beaten with a chair in Shikrapur; Filed a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.