पोलिस असल्याची बतावणी करून व्यावसायिकांना गंडा; सांगवी परिसरातील प्रकार, तरुणाला अटक

By नारायण बडगुजर | Published: April 27, 2024 04:31 PM2024-04-27T16:31:07+5:302024-04-27T16:33:05+5:30

नवी सांगवी व  पिंपळे गुरव परिसरात डिसेंबर २०२३ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला....

Frauds businessmen by pretending to be police; Type in Sangvi area, youth arrested | पोलिस असल्याची बतावणी करून व्यावसायिकांना गंडा; सांगवी परिसरातील प्रकार, तरुणाला अटक

पोलिस असल्याची बतावणी करून व्यावसायिकांना गंडा; सांगवी परिसरातील प्रकार, तरुणाला अटक

पिंपरी : पोलिस असल्याची बतावणी करून दुकानदारांकडून विविध वस्तू खरेदी केल्या. त्याचे पैसे न देता पेमेंट ऑनलाइन पाठवल्याचे स्क्रिन शाॅट दाखवून फसवणूक केली. याप्रकरणी संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली. नवी सांगवी व  पिंपळे गुरव परिसरात डिसेंबर २०२३ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. 

अमोल आबासाहेब कायगुडे (३३, रा. सांगवी, मूळगाव गेणशवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर), असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुरेशलाल मिस्त्रिलाल खिंवसरा (६२, रा. सांगवी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २४) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेशलाल हे कापड व्यावसायिक आहेत. त्यांचे कापड विक्रीचे दुकान आहे. संशयित अमाेल कायगुडे याने सुरेशलाल यांच्या दुकानातून खरेदी केली. त्यावेळी त्याने पेमेंट न करता मोबाइलमध्ये फोन पे ॲपमध्ये निकनेमच्या जागी दुकानाचे नाव टाकून स्वत:च्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले. त्यानंतर पेमेंट झाले असल्याची स्क्रिन शाॅट तयार करून दाखवून फसवणूक केली. फिर्यादी सुरेशलाल यांच्यासह इतरांचीही त्याने अशाच पद्धतीने फसवणूक करून एकूण १० हजार ३२० रुपयांचा गंडा घातला.

दरम्यान, पोलिसांनी अमोल याला अटक केली. त्यावेळी तो नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरामध्ये दुचाकीवर येऊन क्राइम ब्रान्च नवी सांगवी पोलिस चौकीमधील पोलिस असल्याची बतावणी करत असल्याचे समोर आले. तसेच त्याच्या गाडीवर महाराष्ट्र शासन असे लिहून व पोलिस असल्याचे भासवण्यासाठी पोलिसांचा लोगो व नाव असलेले किचनचा वापर केला. तसेच वेगवेगळ्या दुकानांमधून वेगवेगळ्या वस्तू खरेदी करून दुकानदारांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. पोलिस उपनिरीक्षक किरण कणसे तपास करीत आहेत.

Web Title: Frauds businessmen by pretending to be police; Type in Sangvi area, youth arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.