...अखेर तलाठी झाले रुजू

By admin | Published: March 21, 2017 05:00 AM2017-03-21T05:00:19+5:302017-03-21T05:00:19+5:30

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील तलाठी कार्यालय हे क्लार्क किंवा शिपायाच्या ताब्यात असल्याने नागरिकांच्या जमीन खरेदी-विक्री नोंद,

Finally, I became a Taloli | ...अखेर तलाठी झाले रुजू

...अखेर तलाठी झाले रुजू

Next

अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील तलाठी कार्यालय हे क्लार्क किंवा शिपायाच्या ताब्यात असल्याने नागरिकांच्या जमीन खरेदी-विक्री नोंद, हक्कसोड पत्र, वारस हक्क नोंद वर्ष होऊन नोंदी होत नाही. ७/१२ व ८ ‘अ’ उताऱ्यासाठी अवसरी खुर्द येथील शासकीय कॉलेजला तलाठ्याची संधी होण्यासाठी पाच किलोमीटर हेलपाटे मारावे लागत असल्याचे ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तातडीने दखल घेत तलाठी एस. एम. गायकवाड हे अवसरी बुद्रुक येथील तलाठी कार्यालयात दाखल झाले.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुकसह अनेक गावांतील तलाठी ७/१२, ८ ‘अ’ उतारे आॅनलाइन करण्याच्या नावाखाली तलाठी भाऊसाहेब नेमून दिलेल्या गावात पंधरा दिवस ते महिनाभरात एखाद्या दिवशी हजर राहतात.
अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी, गावडेवाडी यातीन गावासाठी अवसरी बुद्रुक येथे तलाठी कार्यालय आहे. तीन गावांसाठी सध्या एस. एस. गायकवाड गेली तीन ते चार वर्षांपासून कार्यरत आहे. महसूल मोठा असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना ७/१२, ‘८’ अ उतारे व उत्पन्नाचे दाखले वारंवार लागत असतात. या भागातील शेती बारमाही बागायती असल्याने जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात. तलाठी कार्यालयात एक ते दीड वर्षापासून वारसहक्क नोंद हक्कसोडपत्र करण्यासाठी अर्ज केलेले असून, अद्याप कोणाचीही कोणतीही कामे तलाठ्याला पैसे देऊनसुद्धा झाली नसल्याची तक्रार शेतकरीवर्ग करत आहे. तलाठी एस. एस. गायकवाड यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी अवसरी, टाव्हरेवाडी, गावडेवाडीतील शेतकऱ्यांनी केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच तातडीने तलाठी एस. एस. गायकवाड हे शुक्रवारी सकाळी कार्यालयीन वेळेत अवसरीतील तलाठी कार्यालयात उपसिथत राहून सर्वांना ७/१२, ८ ‘अ’ उतारे लगेच देण्यास सुरूवात केली.

Web Title: Finally, I became a Taloli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.