PHOTOS: मुंबईच्या खेळाडूंसोबत फोटो काढून प्रसिद्धी मिळवणारी 'मिस्ट्री गर्ल', कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 07:57 PM2024-03-28T19:57:12+5:302024-03-28T20:05:23+5:30

Who Is Sejal Jaiswal: मुंबईच्या खेळाडूंसोबत फोटो काढून 'मिस्ट्री गर्ल'ने प्रसिद्धी मिळवली.

मुंबई इंडियन्सचा संघ त्यांच्या खराब कामगिरीमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. मुंबईला आपल्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला.

गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सचा पराभव केला. अशातच मुंबईच्या खेळाडूंचे एका मिस्ट्री गर्लसोबतचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

या मिस्ट्री गर्लने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मुंबईचे शिलेदार दिसत आहेत.

मुंबईच्या खेळाडूंसोबत दिसणाऱ्या तरूणीचे नाव सेजल जैस्वाल असे आहे. तिने अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्या आहेत. ती रोहित शर्मापासून प्रशिक्षक लसिंथ मलिंगासोबत फोटो काढताना दिसली.

याशिवाय मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, पियुष चावला, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराहसह इतरही खेळाडूंसोबत सेजलने फोटो काढला.

सेजल जैस्वाल ही एक अभिनेत्री आहे. 'दिल मांगे मोर' आणि 'डेटिंग इन द डार्क' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

सेजल जैस्वाल शालेय जीवनापासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. तिने वयाच्या १९ व्या वर्षापासून मॉडेलिंगला सुरुवात केली होती.

तिचे इंस्टाग्राम अकाउंट ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. तिने अनेक सेलिब्रिटींसोबत फोटो काढले आहेत.