Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 03:06 PM2024-04-28T15:06:38+5:302024-04-28T15:42:43+5:30

Saumya Tandon : अभिनेत्री सौम्या टंडन सध्या त्रासात आहे. ती आजारी असून प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

'भाबीजी घर पर हैं' या लोकप्रिय टीव्ही शोमधून अभिनेत्री सौम्या टंडनला घराघरात ओळख मिळाली आहे. सौम्या या शोमध्ये गोरी मॅमच्या भूमिकेत दिसली होती.

सौम्याची ही भूमिका चाहत्यांना इतकी आवडली की शो सोडल्यानंतरही लोक तिला गोरी मॅम या नावानेच ओळखतात. तिची ही भूमिका सर्वांच्याच विशेष लक्षात राहिली आहे.

अभिनेत्री सौम्या टंडन सध्या त्रासात आहे. ती आजारी असून प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सौम्याने स्वत:च याबाबत माहिती दिली आहे. हॉस्पिटलच्या बेडवरचे काही फोटो शेअर केले आहेत. सौम्याच्या हातावर ड्रिप असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अभिनेत्रीने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. "फोटो नेहमीच सुंदर नसतात आणि आयुष्य नेहमीच हसत नसतं" असं तिने म्हटलं आहे.

"माझी प्रकृती सुधारत आहे आणि लवकरच मी फिट होऊन परत येईन. तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद" असंही सौम्याने म्हटलं आहे.

सौम्या टंडनला नेमकं काय झालं हे अद्याप माहीत नाही, परंतु अभिनेत्रीच्या या पोस्टमुळे चाहत्यांना तिची खूप काळजी वाटत आहे. ते चिंतेत आहेत.

सौम्या टंडनने टीव्ही शोशिवाय चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिने 'जब वी मेट' आणि 'वेलकम टू पंजाब' मध्ये काम केलं आहे. ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून नेहमीच फोटो शेअर करत असते.