Astro Tips: शिवपुराणात दिलेले मंत्र आजारांवर ठरतील प्रभावी; रोज एक माळ जपा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 01:36 PM2024-03-28T13:36:23+5:302024-03-28T13:39:50+5:30

Astro Tips: अध्यात्माचा आणि आरोग्याचा निकटचा संबंध आहे. कारण पैशांनी इतर भौतिक सुखं मिळवता येतीलही, पण मनःशांती देण्याची ताकद फक्त अध्यात्मात आहे. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, 'मन करा रे प्रसन्न, साऱ्या सिद्धीचे कारण' अर्थात मन शांत असेल तरच सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करता येतील. मात्र आपले शरीरच आजाराने ग्रासले असेल तर मन नामस्मरणात कसे रमणार? यासाठीच शिवपुराणात काही मंत्र दिले आहेत. ज्या आजाराचा आपल्याला तीव्रतेने त्रास होत आहे, त्या आजाराशी संबंधित मंत्र म्हणून मनःशांती मिळवावी आणि आजारातून बरे होण्याची क्षमता वाढवावी.

आजाराशी संबंधित मंत्रजप करत असताना जपाची माळ अवश्य घ्यावी. त्यातही ती माळ रुद्राक्षाची असेल तर उत्तमच! मेरुमणीपासून सुरुवात करावी. ईश्वराचे स्मरण करावे आणि एक एक मणी पुढे ओढत नाम जप करावा. एखादी व्यक्ती आजाराने ग्रस्त असेल तर तिच्याशी संबंधित एखाद्या व्यक्तीने आजारी व्यक्तीच्या उशाशी बसून नाम जप केला असता तेवढाच लाभ मिळतो. आता जाणून घेऊया आजार आणि त्यानुसार दिलेल्या मंत्रांविषयी!

कॅन्सर : ॐ नमः शिवाय शम्भवे कर्केशाय नमो नमः

ताप : ॐ नमः शिवाय शम्भवे ज्वरेषाय नमो नमः

श्वसनाचे विकार : ॐ नमः शिवाय शम्भवे श्वासेशाय नमो नमः

कफ : ॐ नमः शिवाय शम्भवे शितेशाय नमो नमः

हृदयविकार : ॐ नमः शिवाय शम्भवे व्योमेशाय नमो नमः

अनिद्रा : ॐ नमः शिवाय शम्भवे चंद्रेशाय नमो नमः

मधुमेह : ॐ नमः शिवाय शम्भवे भवेशाय नमो नमः

पक्षाघात : ॐ नमः शिवाय शम्भवे खगेशाय नमो नमः