शेततळ्यात पडलेल्या भावाला वाचविण्यासाठी उडी घेतली; पण दोघांचाही गाळात अडकून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 02:05 PM2024-04-30T14:05:19+5:302024-04-30T14:05:27+5:30

शेततळ्याजवळ फिरत अचानक एकजण पाय घसरून तळ्यात पडला

jumped to save his brother who had fallen in the field; But both of them got stuck in the mud and died | शेततळ्यात पडलेल्या भावाला वाचविण्यासाठी उडी घेतली; पण दोघांचाही गाळात अडकून मृत्यू

शेततळ्यात पडलेल्या भावाला वाचविण्यासाठी उडी घेतली; पण दोघांचाही गाळात अडकून मृत्यू

सोनपेठ ( परभणी) : तालुक्यातील नरवाडी येथे शेततळ्यात पडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. सम्यक वाघमारे आणि स्वप्निल बनसोडे अशी मृतांची नावे आहेत. मृत दोघेही मावस भाऊ होते.

सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथे दोन मुले व दोन मुली गावाजवळील शेत तळ्याकडे गेले होते. यावेळी सम्यक वाघमारे ( ६ ) हा शेततळ्यात पडला असता त्यास वाचविण्यासाठी स्वप्निल बनसोडे ( ९ रा. संभाजीनगर ) याने शेततळ्यात उडी मारली. मात्र, तोही गाळात अडकला. दोघेही बाहेर पाडण्यासाठी धडपड करत असल्याचे पाहून सोबतच्या दोन्ही मुलींनी आरडाओरडा केला. आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतले. नागरिकांनी दोघांनाही बाहेर काढून सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून सम्यक आणि स्वप्नील यांना मृत घोषित केले.

Web Title: jumped to save his brother who had fallen in the field; But both of them got stuck in the mud and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.