वजन काट्यावर कामगाराचा डोक्यात वार करून निर्घृण खून; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 11:47 AM2024-05-03T11:47:23+5:302024-05-03T11:48:03+5:30

पालम शहरालगतच्या वजन काट्यावरील घटना

A gruesome murder of a worker by stabbing him in the head with a weighing fork; The body was found in a pool of blood | वजन काट्यावर कामगाराचा डोक्यात वार करून निर्घृण खून; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

वजन काट्यावर कामगाराचा डोक्यात वार करून निर्घृण खून; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

पालम ( परभणी) :  शहराजवळील एका वजन काट्यावरील कामगाराचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना आज पहाटे ४ वाजता उघडकीस आली. कोंडीबा नारायण शेवटे (४७, रा. सिरपूर, ता.पालम) असे मृताचे नाव आहे. 

पालम ते लोहा रोडवर एक वजन काटा आहे. तिथे कोंडीबा नारायण शेवटे हे १० वर्षांपासून काम करत होते. ते कुटुंबासह वजन काट्याच्या बाजूला एका रूममध्ये राहत. गुरुवारी रात्री काम आटोपून कोंडीबा शेवटे रात्री वजन काट्याच्या समोर बाजेवर झोपी गेले. दरम्यान, आज पहाटे ४ वाजता शेवटे यांच्या पत्नीला त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यांनी याची माहिती नातेवाईकांना फोन करून दिली.

नातेवाईकांनी पालम पोलीस ठाण्यात याची माहिती आली. लागलीच पालम पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पालम ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. यावेळी पाहणीत पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही बंद दिसून आले.

Web Title: A gruesome murder of a worker by stabbing him in the head with a weighing fork; The body was found in a pool of blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.