गॅजेस्ट स्पेक्स किती आहे?

By admin | Published: June 25, 2015 02:27 PM2015-06-25T14:27:45+5:302015-06-25T14:27:45+5:30

मोबाइल विकत घेताना तुम्ही नक्की काय तपासता? त्यातली स्पेसिफिकेशन्स चांगली की वाईट हे कसं ठरवता? त्यासाठीच ही काही सूूत्रं.

What's the Gadget SPACE? | गॅजेस्ट स्पेक्स किती आहे?

गॅजेस्ट स्पेक्स किती आहे?

Next
>या प्रश्नाचं उत्तर कसं द्याल तुम्ही?
 
खरं म्हणजे नवा स्मार्टफोन किंवा टॅबलेट विकत घेणं म्हणजे किती आनंदाचं आणि  उत्साहाचं काम! ऑर्डर केली, 2-3 दिवसात डिलिव्हरी मिळाली की सगळीकडे नवंकोरं गॅजेट मिरवायला आपण मोकळे. मज्जाय ना! 
पण थांबा. 
या सगळ्या रम्य, मखमली मार्गावर एक काटा आहे तो म्हणजे स्पेक्सचा.
म्हणजेच गॅजेट स्पेसिफिकेशन्सचा. 
प्रोसेसर काय, जीपीयू-सीपीयू काय, मेगापिक्सेल्स काय, ह्यंव प्रकारची टचस्क्रीन अन् त्यंव प्रकारचा डिस्प्ले काय, डोक्याला नुसता खुराक! त्यातलं आपल्याला काही कळत नाही. मग एखाद्या जाणकार भासणा:या मित्र-मैत्रिणीला फोन करायचा आणि त्यांचा सल्ला त्यांच्या अफाट ज्ञानाचं कौतुक करत मुकाट ऐकायचा. 
पण हे सारं सांगितलंय कुणी, आपणच आपलं माहिती करून घेतलेलं बरं!
गॅजेटच्या तीन सर्वात महत्त्वाच्या स्पेसिफिकेशन्सचं (प्रोसेसर, मेमरी आणि डिस्प्ले) हे गाइड वाचा आणि  तुम्हीही व्हा गॅजेटचे एक्सपर्ट! 
 
1. प्रोसेसर किंवा चिप
गॅजेटमधला हा पार्ट म्हणजे त्याची बुद्धिमत्ता. ही जितकी जास्त तेवढे अधिक कठीण काम करण्याची त्या गॅजेटची क्षमता. गॅजेटसाठी कठीण कामे म्हणजे मल्टीटास्किंग गेम्स वगैरे. कमी क्षमतेच्या प्रोसेसरला अशी कामं जरा जडंच. मग लॅग येणं, गरम होणं, हॅँग होणं असे प्रकार होतात. 
* प्रोसेसर कोअर - प्रोसेसरचे सध्याचे आघाडीचे प्रकार म्हणजे सिंगल कोअर, डय़ुअल कोअर, क्वाड कोअर, ऑक्टा कोअर वगैरे. जितके कोअर जास्त तितकी क्षमता जास्त आणि बॅटरीचा वापर अधिक काटकसरीने. 
* (GHz) अर्थात गिगाहर्टज् - प्रोसेसरची क्षमता मोजण्याचे एकक. यालाच क्लॉक स्पीड असेही म्हणतात. 
* प्रोसेसर कंपन्या - क्वालकॉम (अॅण्ड्रॉईड फोन्ससाठी स्नॅपड्रॅगन हा प्रोसेसर बनवणारी आघाडीची कंपनी), सॅमसंग (आयफोन 6 चा  हा अॅपलने डिझाइन केलेला प्रोसेसर सॅमसंग तयार करते) आणि टेक्सास इन्स्ट्रमेण्ट्स (OMAP)
* आता स्नॅपड्रॅगन क्वाडकोअर 2.5 गिगाहर्टज्  प्रोसेसर असं कुणी म्हटल्यावर बावरून जायचं नाही. डोळे झाकून ओळखायचे की हा एक 30 ते 4क्ह0जार रुपयांच्या रेंजमधला आघाडीचा अॅण्ड्रॉईड फोन आहे. हाय-एण्डचे गेम्स खेळायचे असतील तर प्रोसेसरची क्षमता जितकी जास्त तितकं चांगलं. 
 
2. मेमरी, रॅम फोनची मेमरी म्हणजे त्याची फाईल साठवण्यासाठी उपलब्ध असलेली जागा. ही साधारणपणो मोजली जाते जीबी किंवा एमबीमधे. एक हजार एमबी म्हणजे एक जीबी. 
* इंटर्नल/एक्स्पांडेबल मेमरी किंवा स्टोरेज - ब:याच अॅण्ड्रॉईड फोनसाठी ‘16 जीबी मेमरी, एक्स्पाण्डेबल अपटू 64 जीबी’ असे लिहिलेले असते. याचा अर्थ असा की फोनची स्वत:ची हार्डडिस्क 16 जीबीची आहे आणि मेमरी कार्ड वापरून तुम्ही ती 64 जीबीर्पयत वाढवू शकता. आजकाल ब:याच हाय-एण्ड फोन्समध्ये एक्स्पांडेबल मेमरी नसते. तुम्ही फोनवर मुव्हीज बघत असाल, तुमचं म्युङिाक कलेक्शन मोठं असेल किंवा तुम्ही जर भरपूर फोटोग्राफी करत असाल तर अर्थातच तुम्हाला जास्त मेमरी असणारा फोन घ्यावा लागेल. 
* रॅम- जेव्हा आपण एखादे अॅप ओपन करतो तेव्हा ते स्टोरेजमधून रॅममध्ये लोड होते. जितकी रॅम जास्त तितका जास्त स्पीड आपल्याला अनुभवायला मिळतो. आजकाल बरेच हाय-एण्ड अॅण्ड्रॉईड फोनमध्ये 4 जीबीर्पयत रॅम उपलब्ध आहे.
 
3. प्रोसेसर क्षमता जितकी जास्त तितका फोन फास्ट असतो का? 
फोनच्या स्पीडवर परिणाम करणारे आणखी दोन महत्त्वाचे घटक म्हणजे फोनची ऑपरेटिंग सिस्टीम आणि जे अॅप आपण वापरतो त्याची रचना. ढोबळमानाने अॅण्ड्रॉईड फोनसाठी जास्त क्षमतेचे प्रोसेसर आणि  रॅम म्हणजे जास्त स्पीड हे गणित अगदी लागू होते. परंतु सर्वात जास्त क्षमता असलेल्या अॅण्ड्रॉईड फोनपेक्षाही आयफोन-6 सारखा फोन कमी क्षमता असूनही जास्त स्मूथ चालतो याचे कारण म्हणजे या ऑपरेटिंग सिस्टीमची रचना आणि तिची अॅपलच्या हार्डवेअरशी घातलेली उत्कृष्ट सांगड. 
 
4. टचस्क्रीन/डिस्प्ले : यात महत्त्वाचे तीन स्पेक्स आहेत. 
* स्क्रीन साईज, रिझोल्युशन : स्क्रीन साइज म्हणजे स्क्रीन कर्णाची लांबी. आजकाल पाच इंचाच्या आसपास स्क्रीन साईज असणा:या  फोन्सचा ट्रेंड आहे. रिझोल्युशन म्हणजे या स्क्रीनवर किती पिक्सेल्स आहेत - उदा. आयफोन 6 प्लसचे स्क्रीन रिझोल्युशन आहे  1080 म्हणजे या फोनच्या स्क्रीनच्या लांबीवर 1920 पिक्सेल्स आहेत, तर रुंदीवर 1080  पिक्सेल्स आहेत. 
* वेगवेगळ्या स्मार्टफोन कंपन्या वेगवेगळ्या  प्रकारची डिस्प्ले टेक्नॉलॉजी वापरतात. उदा. सॅमसंग आणि मोटोरोला AMOLE, अॅपल, सोनी एक्सपेरिया,  एलजी आणि नेक्सस-6  IP LCD HTC- Super LCD.AMOLED  यामध्ये डिस्प्ले कॉण्ट्रास्ट जास्त असतो. पण यांना बॅटरी जास्त लागते. एलसीडी स्क्रीन्सवर त्यामानाने कमी कॉण्ट्रास्ट असतो. पण प्रखर प्रकाशात त्या जास्त चांगल्या प्रकारे दिसतात. त्यांना बॅटरीदेखील कमी लागते. स्क्रीन्स कुठल्याही अॅँगलने चांगल्या दिसतात. 
 
5. रिझोल्युशन जेवढे जास्त तेवढा डिस्प्ले चांगला असतो का? 
- जास्त रिझोल्युशनचा डिस्प्ले अधिक चांगला नव्हे. रिझोल्युशन किती इंची स्क्रीनवर आहे हे तितकेच महत्त्वाचे. हे मोजण्याचे स्पेसिफिकेशन म्हणजे पीपीआय (पिक्सेल्स पर इंच) किंवा पिक्सेल डेन्सिटी. ते जितकं चांगलं तितका डिस्प्ले अधिक स्पष्ट आणि चांगला. 
- गणोश कुलकर्णी

Web Title: What's the Gadget SPACE?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.