गाडी बुला रही है. - ऑटो अँण्ड ऑटो कम्पोनण्ट्स

By admin | Published: May 14, 2014 02:42 PM2014-05-14T14:42:03+5:302014-05-14T14:42:03+5:30

ऑटो अँण्ड ऑटो कम्पोनण्ट्स

The train is calling. - Auto and Auto Components | गाडी बुला रही है. - ऑटो अँण्ड ऑटो कम्पोनण्ट्स

गाडी बुला रही है. - ऑटो अँण्ड ऑटो कम्पोनण्ट्स

Next
>‘बाबू, समझो इशारे हॉरन पुकारे, पम पम पम.’ असं गात ‘चलती का नाम गाडी’ असं तत्त्वज्ञान किशोर कुमारने आडी-तिरछी गाडी झुम झुम चालवत सांगितलं त्याला किती वर्षं झाली.
मात्र चलती का नाम गाडी म्हणणारा तो इशारा आपण आजही समजून घेतला तर अपनी भी गड्डी निकल पड सकती हे.?
कसं काय?
जरा आपल्या देशातल्या ऑटो अँण्ड ऑटो कम्पोनण्ट्स म्हणजेच वाहन उद्योगाची माहिती घेऊन पहा. या व्यवसायाची गाडी गेली पाच वर्षं सतत, दरवर्षी १५ टक्के वाढ करत वेगानं धावते आहे. जगभरातले वाहन उद्योजक भारताकडे जगातली सगळ्यात मोठी आणि सर्वाधिक वेगानं वाढत जाणारी बाजारपेठ म्हणून पाहत आहेत.
भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाच्या माहितीनुसार वाहन आणि सुटे भाग उद्योगाची उलाढाल मोठय़ा प्रमाणात वाढत असून, २0१६च्या वर्षाअखरपर्यंत या उद्योगाची उलाढाल १४५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचलेली असेल. त्यातून २0१६ पर्यंत दहा लाख रोजगार संधी या उद्योगात उपलब्ध होऊ शकतील.
आजच्या घडीला भारत ही जगातली सातव्या क्रमांकातली वाहन बाजारपेठ आहे. भारतात आजच्या घडीला १७ कोटी ५0 लाख वाहनं तयार होतात. त्यातील २ कोटी ३0 लाख वाहनं निर्यात केली जातात.
चारचाकीच कशाला दुचाकी वाहनांचं मार्केटही तुफान तेजीत आहे. २0२0पर्यंत भारत ही दुचाकी वाहनांची जगातली तिसर्‍या क्रमांकाची बाजारपेठ बनलेली असेल. दुचाकी वाहन उद्योगात सध्या ११ ते १२ टक्के वाढ आहे, २0२0 पर्यंत ती चौपट झालेली असेल, असा बाजारपेठ विेषकांचा अंदाज आहे.
मुद्दा एकच, आपल्याला जशा नवनव्या गाड्या विकत घ्यायला, चालवायला आवडतील तसतसं ही बाजारपेठ वाढेल आणि त्यानुसार उद्योगात अधिकाधिक हातांना कामं निर्माण होतील.
 
सर्व्हिसिंग/ रिपेअर
एवढी माणसं गाड्या घेतील. चालवतील. त्या गाड्या बिघडतीलही. त्यांचा मेणेन्नस, सर्व्हिसिंग हे सारं सांभाळावंच लागेल. त्यासाठी गॅरेज लागतील. आणि ते ही प्रोफेशनल. गाड्या रिपेअरिंगचं काम काय करायचं, हा दृष्टीकोन सोडून गाड्यांवर प्रेम असलेले आणि मेकॅनिकल भेजा असलेल्या कुणालाही या विषयात उत्तम काम आणि भरपूर पैसा मिळू शकतो.
 
ड्रायव्हर
लोकांची लाइफस्टाइल बदलते आहेच, त्यात उद्योग व्यवसाय, कंपन्यांची वाढ होते आहे. सर्व प्रकारची वाहनं चालवू शकणार्‍या ड्रायव्हरची डिमांडही काळाप्रमाणं वाढणार आहेच. ड्रायव्हिंग ही कला आहे, जिचं प्रशिक्षणही सर्वदूर मिळतंच. हातात स्टेअरिंग घ्यायचं की नाही एवढाच काय तो चॉईस.
 
‘ऑटो ओईएम’
नाव वाचून जरा उडालाच असाल पण ‘ऑटो ओईएम’ ही एक भन्नाट गोष्ट आहे. ओईएम म्हणजे ओरिजनल इक्विपमेण्ट मॅन्युफॅरर. म्हणजे काय तर मोठमोठय़ा कंपन्याही आपल्या गाड्यांचे सगळे पार्ट्स काही स्वत:च बनवत नाहीत. अनेक जण तर वेगवेगळे पार्ट्स एका ठिकाणी असेम्बल करून त्यावर आपला ब्रॅण्ड फक्त चिकटवतात. असे पार्ट्स बाहेर बनवण्याचं काम हे ओईएम करतात. तसा हा विषय तांत्रिक. मात्र ऑटो पार्ट्स बनवण्याचं हे काम आपल्या आसपासही सुरूच असतं. त्याचाच एक भाग म्हणजे ऑटो कम्पोनंट मॅन्युफॅरर. हे लोकही ऑटो कम्पोनंट बनवण्याचं काम करतात. अधिक प्रोफेशनली काम करणार्‍यांची एक संस्थाही आहे. ऑटोमोटिव्ह कम्पोनंट मॅन्युफॅरर असोसिएशन ऑफ इंडिया. . http://acma.in या वेबसाइटवर अधिक माहिती मिळू शकेल.
 
वित्त सेवा
 गाड्यांची खरेदी विक्री, सेल्स सर्व्हिस, इन्श्युरन्स, व्हॅल्युअर या सगळ्या सेवा ऑटो उद्योगाबरोबरच वाढतील. त्यामुळे इन्श्युरन्स काढणं, अपघातानंतर गाड्यांचं व्हॅल्युएशन करणं, गाडी कोणती घ्यायची हा सल्ला देण्यापासून कस्टमर सर्व्हिसेस पुरवणं हे सारं सेवा क्षेत्रात येतं. त्यासाठी उत्तम संवाद कौशल्य असलं आणि स्वत:ला बोलतं केलं तरी अनेक संधी मिळू शकतात.
 

Web Title: The train is calling. - Auto and Auto Components

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.