दोन रेषांचे भलतेसलते अर्थ

By admin | Published: November 27, 2015 09:05 PM2015-11-27T21:05:13+5:302015-11-27T21:05:13+5:30

व्हॉट्सअॅप नाही असा फोन तरुण मुलामुलींच्या हातात दिसणार नाही. सतत ऑनलाइन,

Meaning of two lines | दोन रेषांचे भलतेसलते अर्थ

दोन रेषांचे भलतेसलते अर्थ

Next

 व्हॉट्सअॅप नाही

असा फोन तरुण मुलामुलींच्या हातात
दिसणार नाही.
सतत ऑनलाइन,
सतत शेअरिंग,
लास्ट सीन,
ब्ल्यू स्टिक,
हे सारं रोजच्या जगण्याचा भाग झालं.
पण त्यानं नाती मजबूत होत नाहीयेत
तर कुजताहेत,
काचताहेत
आणि संशयी होत एकमेकांना छळताहेत.
 
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या संज्ञापन विभागातील महेशकुमार मुंजाळे आणि पूजा अवसरमोल या विद्याथ्र्यानी अभ्यासक्रमातील ‘नवमाध्यमांचा अभ्यास’ या विषयांतर्गत सादर केलेल्या लघुसंशोधनात हाती लागलेली ही काही निरीक्षणं.
या संशोधनाकरिता महाराष्ट्रातील विविध शहरांमधील सोशल साइट्स आणि व्हॉट्सअॅप वापरणा:या तरु ण-तरुणींच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
 
दीपक. रात्री उशिरार्पयत त्याच्या मैत्रिणीसोबत व्हॉट्सअॅपवर चॅट करायचा. परंतु दिवसभराच्या थकव्याने कधीकधी त्याला नकळतपणो झोप लागून जायची. अशावेळी व्हॉट्सअॅप बंद करणो राहून जायचे. परिणामी तिने पाठविलेल्या मेसेजखाली तिला ब्ल्यू टीक दिसायची. आणि आपले मेसेज पाहूनदेखील इतर कुणाशी बोलत असतो असा तिचा ठाम समज व्हायला लागला. त्यातून भांडणं. मग त्यानं कंटाळून  मोबाइलमधून व्हॉट्सअॅप काढून टाकले. अर्थात तो निर्धार फार काळ टिकला नाही. पुन्हा त्यानं डाऊनलोड केलंच ते. मात्र गैरसमजांची मालिका काही कमी झाली नाही.
**
सुयोग आणि प्रतिमा हे एकमेकांचे भावी जीवनसाथी. सुयोगची लहान बहीण सुमती पुण्याला वसतिगृहात राहते. सुयोग जेव्हा सुमतीसोबत व्हॉट्सअॅपवर बोलत असतो त्याचवेळी नेमके प्रतिमा मेसेज करते. सुयोग बहिणीशी बोलण्यात व्यग्र असल्याने त्याला प्रतिमाचे मेसेज आलेले समजत नाहीत. तिकडे प्रतिमाला सुयोग ‘ऑनलाइन’ दिसतो पण त्याचे रिप्लाय न आल्याने ती गैरसमज करून घेते आणि नेहमीप्रमाणो आपल्याला तो टाळतोय, महत्त्व देत नाही, दुसरी कुणी अतिमहत्त्वाची व्यक्ती भेटलीय की काय यांसारखे ना-ना त:हेचे प्रश्न विचारून त्यांच्यात भांडणं सुरू होतात. हे वाद अनेकदा नाते तुटण्यापर्यंतच्या टोकाला गेले आहेत.
**
नंदन वसतिगृहात राहतो. रात्री उशिरार्पयत अभ्यास करतेवेळी वापर नसतानाही उगाचंच ‘व्हॉट्सअॅप’ सुरू ठेवण्याची त्याची सवय होती. झोपी गेला तरी तो ऑनलाइन असल्याचे दिसायचे. अनेक दिवस घरच्यांनी या ऑनलाइनवर बारकाईने लक्ष ठेवले. तुझी कुणी गर्लफ्रेंड असावी म्हणून तू रात्र रात्र व्हॉट्सअॅप मेसेज करत जागा राहतोस, असा अंदाजवजा आरोप करून त्याचा मोबाइल काढून घेण्यात आला. या सर्वात घरच्यांचा आपल्या मुलावरील विश्वास उडाला आणि त्यालाही या सर्व गोष्टींमुळे खूप मानसिक ताण सहन करावा लागला. 
**
अमित हा एक अभियांत्रिकीचा विद्यार्थी. त्याचे काका पोलिसांत आहेत. अतिशय कडक शिस्तीचे पाईक. वडिलांपेक्षा काकांचा खूप धाक. अमित जास्त वेळ ऑनलाइन दिसला की खरडपट्टी सुरू, कॉलेजच्या वेळेत ऑनलाइन दिसला की खरडपट्टी सुरू, अभ्यास करतेवेळी ऑनलाइन दिसला की झाली खरडपट्टी सुरू, रात्री-अपरात्री उशिरापर्यंत ऑनलाइन दिसला की  पुन्हा तेच. या सततच्या पाळतीने तो इतका त्रसलाय की त्याला ते व्हॉट्सअॅप फोनमधून काढून टाकावेसे वाटते. पण तरीही तो हे करू शकत नाही कारण काकांनी तसे करण्यास मज्जाव केलाय. आपण ऑनलाइन आहोत हे आपला नंबर असणा:या कुणाही ओळखीच्या किंवा अनोळखी माणसाला दाखवणारी सुविधा वापरकत्र्याच्या खासगी स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे हे खरे; पण अमितसारखे असे त्यात दोन्ही बाजूनं अडकतात. 
**
निखिल आणि शोभा, त्यांचं नुकतंच लगA झालं होतं. नोकरी वेगवेगळ्या जिल्ह्यांत असल्याने एकमेकांच्या सहवासास मुकलेले. प्रेमविवाह असल्याने दोघांचेही अनेक मित्र-मैत्रिणी समानच होते. याच गोतावळ्यातील गंगोत्री हीदेखील एक. भूतकाळातील काही अनुभवांवरून आणि काहीशा संशयी वृत्तीमुळे शोभा निखिलचे आणि गंगोत्रीचे रात्रीचे ‘लास्ट सीन’ तपासायची. थोडय़ाफार फरकाने ते कधीकधी एकसारखे असायचे. यावरून ती निखिल आणि गंगोत्री रोज रात्री बोलत असल्याचा संशय घ्यायची. सत्य परिस्थिती अगदीच वेगळी असतानाही स्वत:च्या प्रेमावर विश्वास न ठेवता एका तंत्रज्ञानाच्या सुविधेवर अवलंबून राहिल्याने त्या दोहोंच्या नवविवाहित आयुष्यात संशयाचे आणि गैरसमजाचे मळभ दाटून आले.
**
सौरभ आणि गार्गी, चार वर्षांपासून प्रियकर-प्रेयसी आहेत. परंतु आता त्यांच्या नात्यात त्यांना काहीसे साचलेपण जाणवत आहे. त्याचे कारण म्हणजे ‘लास्ट सीन’. दोघे रात्री मेसेजद्वारे बोलतात. बोलून झाल्यानंतर एकमेकांना ‘गुड नाईट’ म्हणून झोपी जातात. गार्गी मध्यरात्रीच उठते आणि व्हॉट्सअॅप उघडून नवे काही मेसेज आलेत की काय असे सहज तपासून पुन्हा लगेच झोपी जाते. पण या सर्वात होते असे की तिची लास्ट सीन वेळ बदलते आणि मध्यरात्रीची वेळ दिसायला सुरु वात होते. सकाळी उठल्यावर सौरभ उठून जेव्हा तिची लास्ट सीन वेळ पाहतो तेव्हा त्याचे विचारचक्र  भलत्याच दिशेने फिरू लागते. झोपते असे सांगून एवढय़ा उशिरापर्यंत कुणाशी बोलत होती हा प्रश्न निरु त्तरितच राहतो आणि मग होतात कलह. खरेतर लास्ट सीन केवळ शेवटी व्हॉट्सअॅप केव्हा बंद झाले याविषयीची वेळ सांगणारी सुविधा. परंतु त्याचा अर्थ असा काढला जातो की त्या वेळेपर्यंत ती व्यक्ती कुणासोबत तरी बोलतच होती. चालू करून लगेच बंद केल्यामुळेदेखील असे घडत असावे या शक्यतेचा विचारच केला जात नाही.
**
व्हॉट्सअॅप किती लोकप्रिय आहे, हे का कुणी कुणाला सांगायला हवं?  
इतकं लोकप्रिय की लोक प्रत्यक्ष भेटले तरी व्हॉट्सअॅपमधून बाहेर येणं त्यांना कठीण होतं. बोलायचं तर लगेच चार टाळकी एक ग्रुप बनवून टाकतात. धडाधड मॅसेज सुरू.
त्यात ‘ब्ल्यू टीक’, ‘लास्ट सीन’ व ‘ऑनलाइन’ अशा अनेक  सुविधा व्हॉट्सअॅपने पुरविल्या. ‘ब्ल्यू टीक’मुळे म्हणजेच मॅसेजच्या खालच्या दोन निळ्या रेषांमुळे समोरच्या व्यक्तीने आपण पाठवलेला संदेश वाचला की नाही हे समजते. कुणी ऑनलाइन कधी होतं, हे दिसतं. आता हे सारं चांगलं की नाही, पण या सा:यातून अनेक भांडणं, नात्यात गैरसमज, सततचा ताप सुरू झाला आणि तरुण मुलांच्या जगण्यात आधीच भरपूर असलेल्या वादळात काही नवीन तुफानी वारे शिरले.  
त्यातून नाती जवळ येतील अशी आशा होती. पण तसं झालं नाही. उलट कलह वाढू लागले. माणसांचे खासगीपणच संपले आणि प्रत्येक गोष्ट शेअर करण्याच्या नादात सगळ्याच प्रकारचं शेअरिंग बाद होऊन नुस्ताच एकमेकांवर वॉच ठेवणं सुरू झालं. त्यात व्हॉट्सअॅप ग्रुपमधे असलेल्या अनेक लोकांकडून होणारे त्रस, छेडछाड, बुलिंग,  आपल्या फोटोंचा गैरवापर, नकोसे फोन हे सारं सुरू झालं.
आणि त्यातून आजची तरुण मुलं त्रसली आहेत हे नक्की.  
 अशा सततच्या कटू अनुभवांमुळे सोशल मीडिया वापरणारे त्रसले आहेत. या तंत्रज्ञानाचा उद्देश नाती जोडण्याचा आहे; परंतु अनेकदा त्याच्या विपरीत घडताना दिसते. या तंत्रज्ञानामुळे अनेक फायदे झाल्याचीदेखील उदाहरणो आहेतच; परंतु उपरोक्त प्रकारच्या तोटय़ांचे काय? तंत्रज्ञानाचा आणि मानवी स्वभावाचा दोष जेव्हा एकत्र होतो तेव्हा या अशा घटना घडत जातात. तंत्रज्ञान आपले दोष दूर करायचा तेव्हा करेल; परंतु आपला स्वभाव आणि विचार तर आपल्याच नियंत्रणात आहेत. समईच्या ज्योतीवर पतंगाने अनिवार आकर्षणाने ङोप घ्यावी आणि जळून खाक व्हावे त्याच प्रकारे नवे तंत्रज्ञान आपणास आकर्षित करत आहे. हे तंत्रज्ञानाचे अनिवार आकर्षण टाळणो तसे अवघडच; परंतु त्या आकर्षणाच्या गर्तेत स्वत:ला जाऊ न देण्याचा प्रयत्न प्रत्येक वापरकत्र्यानं करणो आवश्यक आहे. आपण या माध्यमांसमोर स्वत:ला थेट समर्पित करत असतो. हे समर्पण पूर्णत्वाने रोखणो शक्य आहे, पण ते करायचे कुणी?
आणि केले नाही तर हा सोशल मीडियाद्वारे सोशल होण्याचा सोस आपल्याला कुठर्पयत काय काय सोसायला भाग पाडेल याचा विचारही वेळीच व्हायला हवा!
आम्ही केलेल्या या छोटेखानी संशोधनातून तरी हेच दिसलं की, सततच्या व्हॉट्सअॅप वापरानं तरुण मुलांची नाती नासताहेत आणि काचताहीहेत.
पण हे कुणी मान्य करेल तर कसं?
 
- महेशकुमार मुंजाळे
 - पूजा अवसरमोल

 

Web Title: Meaning of two lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.