फक्त 5 झाडांची जादू

By admin | Published: September 4, 2014 04:48 PM2014-09-04T16:48:42+5:302014-09-04T16:48:42+5:30

ऑक्सिजन वाचून वाचून असं वाटायला लागलं की, आपण मित्र-मित्र मिळून तरी काहीतरी करुच शकतो. म्हणून मग आम्ही पाच मित्रंनी ठरवलं की, झाडं लावू. त्यात विशेष काहीच नव्हतं.

Magic of only 5 trees | फक्त 5 झाडांची जादू

फक्त 5 झाडांची जादू

Next

तसं फार मोठं नाही आमचं काम. खरंतर काहीच केलेलं नाही अजून. पण स्वत: काहीतरी करावं असं आमच्यासारख्या गोळ्यांना वाटलं, हेच जास्त.

मी अहमद नगर जिल्ह्यातल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजात शिकतो. पण आमच्या कॉलेजात तशा अॅक्टिव्हिटी काहीच होत नाही. यायचो कट्टय़ावर बसायचो.
पण ऑक्सिजन वाचून वाचून असं वाटायला लागलं की, आपण मित्र-मित्र मिळून तरी काहीतरी करुच शकतो. म्हणून मग आम्ही पाच मित्रंनी ठरवलं की, झाडं लावू. त्यात विशेष काहीच नव्हतं. पण रोपं घेण्याचीही आमची ऐपत नव्हती. आमच्याकडे झाडं लावायला जागाही नव्हती. मग आम्ही जवळच्या वनखात्याच्या कार्यालयात गेलो. त्यांना सांगितलं जास्त नाही फक्त 5 रोपं द्या. त्यांनी आनंदानं दिली. पण लावणार कुठं? मग ठरवलं, आपल्या नेहमीच्या रस्त्यावर लावायची.
लावली. आता आम्ही रोज तिथं जातो. देखभाल करतो. आम्ही जाळ्यापण मागून आणल्या. रोपांना आता छोटी पानं फुटायला लागली आहेत.
आम्हाला एकदम आपण काहीतरी करु शकतो, असा कॉन्फिडन्सच आलाय. आता आम्ही ठरवलंय की, पुढच्या वर्षी कॉलेजात सगळ्यांना घेऊन असा काही उपक्रम करायचा, पण नुस्ती झाडं न लावता प्रत्येकानं एक झाड दत्तक घ्यायचं. ते दोन वर्षे तरी सांभाळायचंच. तुमच्यामुळे हे एवढं तरी करु शकलो. म्हणून सहज लिहून पाठवतोय.
- प्रतीक दांदळे
 

Web Title: Magic of only 5 trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.