ये दुनिया कितनी गोल?

By admin | Published: February 1, 2017 03:55 PM2017-02-01T15:55:46+5:302017-02-01T15:55:46+5:30

आज पत्रकार मैत्रिणीबरोबर धारावीत आलोय. तिला एका कुंभारकाकांची स्टोरी करायचीय. त्यांचा पत्ता शोधतोय. दोघंच चालतोय कधीचे. मागे-पुढे बाकी कोणीच नाहीये

How many goals are this world? | ये दुनिया कितनी गोल?

ये दुनिया कितनी गोल?

Next

 - प्राद सांडभोर

आज पत्रकार मैत्रिणीबरोबर धारावीत आलोय. तिला एका कुंभारकाकांची स्टोरी करायचीय. त्यांचा पत्ता शोधतोय. दोघंच चालतोय कधीचे. मागे-पुढे बाकी कोणीच नाहीये. अगदीच अरुंद वाट. दोन्ही बाजूला घरंच घरं. घनदाट वस्ती. हा सुरू झाला कुंभारवाडा. पणत्या, दिवे, फ्लॉवरपॉट वाळायला ठेवलेत ढिगाढिगांनी. हे असावं त्या काकांचं घर. पत्रकारबाईसाहेब आत शिरल्यापण. ओळख काढून बोलणं सुरू झालंय. कसं बरं जमतं हिला इतक्या सहज लोकांशी बोलायला? आपल्याला कधी बरं जमायचं ते? आता काका त्यांच्या कामाबद्दल बोलताहेत... ‘...जो दिखता है वो बनाता हूँ, कुछ चीजे बिकती हैं तो पेट का गुजारा हो जाता है. पर सिर्फ बेचने के लिये नहीं बनाता... मिट्टीसे खेलना पसंद है मुझे. शुरुआत होती है यहॉँसे, इस मट्टी के गोलेसे. हमारी पृथ्वी कैसी है? - गोल. पेड कैसा होता है? सामने से देखो तो नहीं पर डाली काट के देखो तो पेड कैसा है? - गोल. हमारी आँखे? - गोल. हमारा चेहेरा? - गोल. गर्दन काटो तो क्या मिलेगा? - गोल. हाथ? - गोल - उंगलियॉँ? - गोल. सबकुछ गोल है और मुझे वो इस मिट्टी के गोलेमें दिखता है. जो दिखता है वो बनाता हूँ ...’’ मस्तच! पत्रकार मैत्रीण काय लिहील? - माहीत नाही. - ही गोल गोष्ट मात्र भन्नाट आहे आणि विषय जरा खोल आहे...

 

Web Title: How many goals are this world?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.