स्लिम स्टायलिश कसे दिसतील?

By admin | Published: July 24, 2014 06:30 PM2014-07-24T18:30:30+5:302014-07-24T18:30:30+5:30

वजनदार’ माणसांचे प्रश्न जगभरात चर्चेचा विषय असतात, त्यांनी काय खावंप्यावं इथपासून काय घालावं म्हणजे बारीक दिसतील

How do you look slim stylish? | स्लिम स्टायलिश कसे दिसतील?

स्लिम स्टायलिश कसे दिसतील?

Next
 
वजनदार’ माणसांचे प्रश्न जगभरात चर्चेचा विषय असतात, त्यांनी काय खावंप्यावं इथपासून काय घालावं म्हणजे बारीक दिसतील, याची भरमसाट चर्चा सगळीकडेच. पण बारीक, लुकड्या सुकड्या व्यक्तींनी काय घालावं हे कुणी सांगतच नाही.
उंच, सडपातळ, लुकडी म्हणजेच स्लीम तरुण मुलामुलींनी नक्की काय आणि कसे कपडे घातले तर ते भारदस्त दिसतील? 
- अजया गोवर्धने
अजया, तुझा प्रश्न अगदी योग्य आहे. स्लिम माणसं जगात अल्पसंख्याक झाली असावीत की काय असं वाटावं अशी आजूबाजूची परिस्थिती आहे. ‘इससे छोटा साईज नहीं है’ असं म्हणत स्मॉल साईज ड्रेस आपल्यासमोर हताशपणे टाकणार्‍या सेल्समनचा राग येतो हे खरंय! मात्र न चिडता, आपलं स्लिम असणं एन्जॉय करत विचारपूर्वक कपड्यांची निवड केली तर स्टायलिश तर दिसता येईलच पण आपलं व्यक्तिमत्त्वही उठून दिसेल.
ते कसं करायचं यासाठी या काही सोप्या गोष्टी. फक्त तरुणींसाठीच नाही, तर तरुणांसाठीही!
शोल्डर्स आणि वेस्टलाइन
तरुणांनी कपडे शिवताना आपल्या शर्ट्सना शोल्डर पॅड अँड करून घ्यावेत. खांदे चांगले रुंद दिसतील अशा पद्धतीनं कपडे शिवावेत. त्यासाठी हे शोल्डर पॅड फार उपयोगी दिसतात. 
स्लिम मुलींनी शक्यतो स्लिव्हलेस ड्रेसेस घालू नयेत. त्यामुळे दंड अजूनच बारीक दिसतात. त्याऐवजी पफ स्लिव्हज वापराव्यात. एरवी बाह्या प्लेन रंगाच्या असू नयेत, त्याऐवजी त्यावर काहीतरी टेक्श्‍चर, प्रिण्ट असावेत. कंबरेला घट्ट बेल्ट लावणं टाळावं. आवळून पट्टा बांधल्यानं कंबर आणखीनच बारीक दिसते.
फॅब्रिक्स
ड्रेसचं कापड असं पाहिजे जे थोडं फुगीर दिसेल, फुलेल. अंगाला चिकटणारे कपडे मुळीच घालू नयेत. मुलंमुली दोघांनीही कॉटन, कॉरड्री, वूल, लिनन, प्युअर सिल्क, ऑरगांझा, वेल्वेट, ब्रॉकेड, रॉ सिल्क, कॉटन सिल्क या फॅब्रिकचे कपडे शक्यतो वापरावेत.
शिफॉन, जॉर्जेट, क्रेप सिल्क, सॅटिन, लायक्रा, स्ट्रेचेबल टाईट फिटिंग घालू नयेत.
लेअर अप
आपण थोडे जाडसर दिसू असा फिल कपड्यांमुळे आला पाहिजे, हे सूत्र पक्कं. मग त्यासाठी कपड्यांवर कपडे घालणंही एकदम फॅशनेबल दिसू शकतं. आतून टी शर्ट घालून, त्यावरून एखादा चेक्सचा शर्ट घालायचा. दिसतोही ट्रेण्डी आणि थोडं जाडही झाल्यासारखं वाटतं. नाहीतर रुंद शोल्डर्सची जॅकेट घालायलाही हरकत नाही. लांब बाह्यांच्या टीशर्टवर छोट्या बाह्यांचा टीशर्ट घालणंही एकदम ट्रेण्डी.
परफेक्ट फिटिंग
आपण बारीक आहोत त्यामुळे ढगळे कपडे घातले तरी चालतात किंवा ढगळेच कपडे घालायला पाहिजेत, असा काही मुलामुलींचा चुकीचा समज आहेच. त्यामुळे घट्ट, टाईट फिटिंगचे कपडे घालू नयेत, त्यानं अजून बारीक दिसाल. पण ढगळेही घालू नयेत त्यानं गबाळे दिसतात. काठीला कापड गुंडाळावं आणि बोंगा व्हावा असं काहीतरी दिसतं. तुम्हाला तुमच्या लुकडेपणाचा काहीतरी कॉम्प्लेक्स आहे, असा मेसेजही त्यातून जातोच. तेव्हा तसं करू नका. मापाचे, उत्तम फिटिंगचे कपडे शिवा. ज्या मुलींना आपल्या बारीक असण्याचा फारच जास्त कॉम्प्लेक्स आहे त्यांनी चुडीदारच्या ऐवजी सलवार, पटियाला हे प्रकार जास्त वापरावेत.
व्हॉल्यूम वाढवा
    हा एक सगळ्यात चांगला सोपा उपाय. कपड्यांना चक्क आतून अस्तर लावा. नाहीतर मग पिनटक्स, प्लेट्स, रफल्स असे उपाय करुन कपडे जास्त फुगीर दिसू शकतात.
प्रिण्टस
बारीक प्रिण्टचे कपडे शक्यतो वापरू नका. त्याऐवजी बोल्ड प्रिण्ट्स वापरा. पेस्टल किंवा डार्क कलर्स आणि मीडियम प्रिण्ट असं कॉम्बिनेशनही चांगलं दिसतं. 
उभ्या रेघारेघांचे कपडे वापरू नका. हे खास तरुणांसाठी, रेघारेघांचे शर्ट घालू नका.
अँक्सेसरीज
मनगटावर मोठ्ठाली घड्याळं, मोठय़ा बॅगा, बेल्ट्स, गळ्यातले, कानातले वापरू नका. ते तुमच्या देहापेक्षा मोठे दिसतात, आणि मग त्यात तुम्ही अजून बारीक दिसता.
- प्राची खाडे
स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर

Web Title: How do you look slim stylish?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.