FTII वाले

By admin | Published: June 25, 2015 02:48 PM2015-06-25T14:48:57+5:302015-06-25T14:48:57+5:30

‘एफटीआयआय’ या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची सरकारनं नियुक्ती केली. पण त्यांचं सिनेजगतात योगदान काय, अभिनेते म्हणून पत काय, असा सवाल करत आणि त्यांच्या नियुक्तीला विरोध करत संस्थेतील विद्याथ्र्यानी आंदोलन पुकारलं आणि संस्थेचं काम बंद पाडत संप पुकारला. एफटीआयआयच्या विद्याथ्र्याची, त्यांच्या कामाची, जीवनशैलीची चर्चा सुरू झाली आणि काहींनी त्याबद्दल जाहीर नाकं मुरडली. टीका केली. खरंच आहे कसं त्यांचं जग? त्याचा हा एक शोध..

FTII ones | FTII वाले

FTII वाले

Next

- नम्रता फडणीस 

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया. हे संस्थेच्या प्रवेशद्वारावर कोरीव अक्षरात इंग्रजीत लिहिलेलं एक उंच नाव. एरवी रस्त्यानं जातानाही दिसते ती एक कमान. बाकी पुण्यातल्याही ‘डे टू डे’ लाइफचा  त्यांच्याशी (आणि त्यांचाही बहुधा पुण्याशी) काही संबंधच नाही. बर्म्युडावाले तरुण

आणि स्कर्टवाल्या नकचढय़ा लूकच्या मुली आणि  सिगारेटचे झुरके घेत चालणा:या गप्पा असं सगळं असतं म्हणो तिथे. ..खरंच असं आणि एवढंच असतं? पण त्यांचं जग नेमकं आहे तरी कसं?
 
‘एफटीआयआय’ च्या कॅम्पसमधल्या गप्पांचा लाइव्ह रिपोर्ट! 
 
 
 
 
‘सुश्या, एफटीआयआयमध्ये नक्की काय शिकवतात रे?’
‘अरे तो ऑस्कर विनर रसूल पोकुट्टी म्हणो इथूनच पासआऊट झालाय.’
‘कशी असतात ती मुलं? काय ते कपडे. काय तो अवतार..  ही मुलं इथे टाइमपासच करायला येतात बहुतेक..’
 पुण्यातील तरुणाईचा एफटीआयआयमधल्या विद्याथ्र्याकडे पाहण्याचा हा प्रथमदर्शी दृष्टिकोन. अॅडमिशन्सच्या या मोसमात एरव्ही अवतीभोवतीच्या जगात काय चाललं आहे हे पाहण्याचीदेखील उसंत नसलेल्या पुणोकर तरुणाईच्या  विश्वात ‘एफटीआयआय’ या नावानं एकदम एण्ट्री मारली. तिथल्या विद्याथ्र्यानी एक आंदोलन सुरू केलं आणि पुण्यात शिकणा:या पण चुकून कधी एफटीआयआयच्या वाटेनं न गेलेल्या तरुण मुलांनीही त्या संस्थेच्या गेटच्या आसपास एक राऊण्ड मारलाच. 
‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ हे संस्थेच्या प्रवेशद्वारावर कोरीव अक्षरात उंच लिहिलेलं इंग्रजीमधील एक नाव.  एरवी रस्त्यानं जातानाही तेवढी कमानच दिसते. बाकी पुण्यातल्याही ‘डे टू डे’ लाइफचा त्यांच्याशी (आणि त्यांचाही बहुधा पुण्याशी) काही संबंध नसल्याने त्या जगात नेमकं चालतं काय किंवा ते जगच चालतं कसं याची कुणाला फारशी कल्पनाही नसते. एफटीआयआयची मुलं पाहिली की यांचं जग कुठलंतरी वेगळं आहे असाच एक सर्वदूर समज.
मात्र एफटीआयआयवाले विद्यार्थी आंदोलन करू लागले आणि ते आंदोलन कव्हर करण्यासाठी मी रोज उठून एफटीआयआयमध्ये जाऊ लागले आणि त्यातून एक नवीन जग मलाही भेटलंच.
अर्थात तिथं जातानाच लक्षात आलं की, अपरिचयातून रुजलेले आपले समज, आपले आकस, आपल्या धारणा हे सगळं भलतंच एकरंगी होतं. आहेही कदाचित. हा कॅम्पस नेहमीच्या कॉलेजांसारखा नाही. इथे गलका आहे, आवाज आहेत, वादविवाद आहेत, बेफिकिरी वाटेल अशी मुक्तता आहे, एरवी पचायला अवघड असे विचार आहेत आणि आपण कल्पनाही करू शकलो नसतो असं आयुष्य जगण्याची स्वप्नंही आहेत. तिथली संस्कृती वेगळी आहे, ती आहे तशी बघायची एवढंच! आत गेल्यानंतर त्या ’भिंती’ बोलायला लागतात !
संस्थेच्या प्रवेशद्वारातून आत गेलं की भेटतो शांत परिसर. डेरेदार वृक्ष. एक ‘मुक्त’ फिल आपोआपच मनावर  चढायला लागतो. कुणाची आडकाठी नाही, ना कसलं बंधन. एका स्वतंत्र जगात आपण प्रवेश करतोय असं वाटतंच. तिथल्या रंगवलेल्या भिंतींमधून मुक्त आविष्कारांची दालनं खुली होतात आणि संगीत, चित्रपट, तंत्रज्ञ या कलात्मक निर्मितीच्या विविध अंगांकडे पाहण्याचा प्रवास सुरू होतो. शत्रुघ्न सिन्हा, जया भादुरी, नसरुद्दीन शहा, सतीश शाह, पेंटल या प्रथितयश सेलिब्रिटींसह सईद मिङर, श्याम बेनेगल यांसारखे चित्रपटनिर्मितीतले खंदे शिलेदारदेखील याच संस्थेतून घडले. ‘स्लमडॉग मिलेनिअर’साठी उत्कृष्ट साऊंड डिझायनरचा ऑस्कर पुरस्कार पुण्याकडे खेचून आणणारा रसुल पोकुट्टीही इथलाच. ‘अरे वो तो एफटीआयआय का हैं’ असं म्हणत इथल्या तरुणांची ‘कॉलर’ ताठ होते. 
साचेबद्ध किंवा चाकोरीबद्ध शिक्षणव्यवस्थेत जाणं नाकारणा:या अनेकांसाठी ही संस्था खरंतर अभिव्यक्तीचं मुक्त विद्यापीठ आहे. इथेच एक ‘विजडम ट्री’ आहे. ज्ञानवृक्ष!  एक मोठं वडाचं झाड. त्याभोवतीचा पार. आणि त्यावर रंगणा:या गप्पा. एरवी तिथं गप्पा रंगतात, चर्चा होतात, वाद जुंपतात. अर्थात, आत्ता आंदोलनामुळे सामसूम होती. पण बंदिस्त वर्गातच शिक्षण घेण्याच्या पद्धतीलाच पूर्णत: फाटा देत, मोकळ्या आकाशाखाली शिक्षण अधिक खुलतं असं सांगणारं हे एक मोठं झाड. आणि तिथं भेटतात अशी मुलं ज्यांना चित्रपटाचा ध्यास आहे. त्यातले काही ‘टगेगिरी’ करतातही; पण त्यातही एक दुनियेला न जुमानणारा बेदरकारपणा आहे. चित्रपटनिर्मिती प्रक्रिया, तंत्र, छायाचित्रण अशा महत्त्वपूर्ण अंगांचा विचार करणा:या आणि दिग्दर्शक, अभिनेता, तंत्रज्ञ, सिनेमोटोग्राफर घडवणा:यांचं हे जग.  
काहींच्या हातात जळत्या सिगारेट. काहींच्या केसाच्या जटा झालेल्या. ढगळे, अजागळ कपडे असा एकूण अवतार. काही मुलं टीशर्ट आणि बम्यरुडावाले, मुली लॉँग स्कर्ट, नाकात रिंग अशा ‘लूक’वाल्या. वरकरणी ते कुठल्याही शैक्षणिक चौकटीच्या रंगरूपात बसतही नाहीत. एरवी नेहमीच्या संकेतांना रुळलेल्यांना धक्के बसणं हे इथे पावलापावलावर घडू शकतं. या मुलांशी बोललं की जाणवतं या मुलांमध्ये कल्पनाशक्ती, नवीन काहीतरी शिकण्यापाहण्याची ऊर्मी आहे. त्यांचा ‘अॅटिटय़ूड’ वेगळा आहे. ते त्यांना हवं तसं जगतात. हवं तेच करतात. 
काही मुलामुलींशी चर्चा रंगली होती. एफटीआयआयमधला वाद चव्हाटय़ावर आल्यावर अनेकांनी टीव्हीवरच्या चर्चामध्ये, पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये या विद्याथ्र्याना खूप दूषणं दिली. त्यांची बेफिकिरी, व्यसनाधीनता (म्हणजे बेदरकारपणो सिगरेटी फुंकत भटकणं वैगेरे), वर्गात न बसता अखंड बाहेर पडीक असणं, कसलेच (म्हणजे वागण्या-बोलण्याचे) संकेत न मानणं अशा अनेकानेक आरोपांचा त्यात समावेश होता. इथल्या विद्याथ्र्याना आपला कोर्स पुरा करण्यात रसच नसतो, ते नुसते इथे तळ ठोकून टाइमपास करतात असाही एक मुद्दा त्यात होता. हा विषय गप्पांमध्ये आल्यावर सगळेच तडकले. एकजण म्हणाला,
‘‘हो आम्ही दिसतो, राहतो, वागतो-बोलतो वेगळे, पण त्यावरून तुम्ही आम्ही कसे आहोत हे ठरवणार का? इथं सगळी वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेली मुलं आहेत. सगळंच सगळ्यांना पटेल असा आग्रह नाही. आमच्या इथं काही मुली सर्रास सिगरेट पितात.. पण मग बिघडलं कुठे?  पण आम्ही बेवडे किंवा चेनस्मोकर नाही. तरीही आमच्यात एक ‘नशा’ आहे आणि ती नशा आहे वेगळं काहीतरी करण्याची! आम्ही अवॉर्ड्स मिळवतो. चांगलं क्रिएटिव्ह काम करतो, पण त्याची कधी चर्चा होते का? नाही. चर्चा भलत्याच विषयाची. आम्ही दिसतो कसे नी वागतो कसे याचीच..!’’  
या जगात साचेबद्ध शिक्षण आणि ठोकळेबाज रट्ट उत्तरांना काही स्थान नाही. स्वत:मधील सृजनशीलता विकसित करण्यासाठी ‘क्लासरूम’ अटेंडन्सची सक्तीही नाही! 8क् टक्के हजेरी असावी हा नियम असला तरी तो कागदावरच! इथली मुलं प्राध्यापकांशीही बिनदिक्कतपणो कोणत्याही विषयांवर खुली चर्चा करतात, वाद घालतात. कॅण्टिनसह संस्थेच्या आवारात लेक्चरऐवजी मुलं इतरत्र कितीतरी वेळ बसलेली असतात. पण त्यांच्याकडे कामंही खूप असतात. अनेक एक्सरसाईज असतात. प्रत्यक्ष प्रोजेक्ट करून दाखवायचे असतात. 
इथला एक मित्र म्हणाला, ‘‘काहीजण म्हणतात आम्ही बरेच रिकामे असतो. पण तसं नाही. इथल्या मुलांचं टाईट शेडय़ूल पाहिलं तर उलट चकितच व्हाल तुम्ही! प्रत्येक वर्षी मुलांना विविध एक्सरसाईज दिले जातात. क्लासरूम क्लास, मास्टर क्लास, फिल्म मेकिंग, डिस्कशन्स, शूट याचा ओव्हरलोड असतो. आणि या सा:यात  स्वत:चं वेगळं अस्तित्व दाखवावं लागतं. मग लायब्ररी, नेट यावरून संदर्भ, सिनेमासाठीची वेगळी दृष्टी विकसित होण्यासाठी विदेशी चित्रपट पाहणं हादेखील अभ्यासाचाच एक भाग असतो. हा अॅकॅडमिक कोर्स वाटत असला तरी याचं स्वरूप खूप वेगळं आहे, खूप टेन्शन्स असतात. त्यात हव्या त्या गोष्टी- सोयीसुविधा नाहीत, तरीही निभावून न्यावं लागतं.’’ - तो सांगतो.
या सा:या दोस्तांशी गप्पा मारताना कळतं की, आपला वेळ घेऊन क्रिएटिव्ह काम करणा:या मस्तमौला तरुणाईचं हे एक जग आहे. ते वेगळं आहे आणि ते वेगळेपण राखणं तिथल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी गरजेचंसुद्धा आहे.
सरसकटीकरणाला विरोध करण्याची जिगर त्यातूनच येत असावी कदाचित! 
 
 
मुक्त श्वास घेण्याची आझादी
 
या संस्थेत अॅडमिशन घेतल्यापासून ते थेट संस्थेत प्रत्यक्ष शिकायला लागल्यानंतरही केवळ एकच विचार आणि एकच ध्यास असतो, तो म्हणजे सिनेमा. झोपेतून उठलं की सिनेमा, जेवताना सिनेमा आणि झोपतानाही सिनेमाचाच विषय! दोस्त जास्तीत जास्त वेळ बोलतात ते सिनेमाविषयीच. त्यातल्या एकूण एक भागाविषयी, अनेक कंगो:यांविषयी आणि त्यातल्या बारकाव्यांविषयी. संस्थेच्या आवारात ठिकठिकाणी अनेक ग्रुप वाद घालत बसलेले, चर्चा करत बसलेले सहज दिसतात. बाकीच्या कॉलेजात होतात तशी लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स इथंही होतात. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दिवस  सुरू होतो. 10 ते 6 लेक्चर्स आणि  प्रॅक्टिकल्स सुरू असतात. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा कॅण्टिनमध्येच होतो. दुपारचं जेवणही कॅण्टिनमध्येच. दुपारी दोन वाजल्यानंतर प्रॅक्टिकलची सेशन्स असतात. त्यात आम्ही 1 ते 10 मिनिटांच्या विविध फिल्म्स बनवत असतो. यासाठी विविध ग्रुप तयार केले जातात आणि त्यांना वेगवेगळे विषय दिले जातात. या विषयांवर आम्हाला सिनेमा करायचा असल्याने बारीकसारीक अभ्यास करून जो तो कामाला भिडतो.  सिनेमा हाच अभ्यास. त्यामुळे चित्रपट, माहितीपट, लघुपट अभ्यास म्हणून पाहावे लागतात. हे करत असताना इथं कुणालाच वेळेचं भान राहत नाही. त्यामुळे या चर्चा, नियोजन, काम करताना रात्र कधी होऊन जाते कळतच नाही. पण संस्थेतील वातावरण पोषक असल्यानं कधीही वेळेची बंधनं आड येत नाहीत. विशेष म्हणजे, या संस्थेत विविध भागांमधून मुलंमुली येतात. त्यांची संस्कृती, खान-पान, राहणीमान  सगळंच परस्परांहून वेगळं असतं. पण चहा-कॉफी पितापिता सिनेमाविषयी बोलत इथं जी दोस्ती होते, जी विचारांची नजर बदलून खुलेपणा येतो तो अनुभवच वेगळा असतो. या संस्थेत अभ्यास करण्याचं आणि विचार व्यक्त करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असल्यानं भन्नाट विषयावर चित्रपट बनवण्याचं किंवा आपला विषय भन्नाट पद्धतीनं मांडण्याचं धाडसही इथंच शिकता येतं.  
दुस:या वर्षापासून आमचं स्पेशलायेशन सुरू होतं. ज्याला जो विषय आवडतो त्या विषयात तो काम करतो. अनेकदा छोटय़ा फिल्म बनवताना शूटिंगसाठी बाहेरही जावं लागतं. 
आणि त्यातून जे शिकायला मिळतं, जे स्वत:चं डोकं लढवावं लागतं ते एरवी कुठेच शिकायला मिळत नाही. एक ‘मुक्त’ आणि ‘विचारी’ अनुभव ही संस्था देते, हे नक्की!
- एफटीआयआयचा एक माजी विद्यार्थी
( त्याच्या विनंतीवरुन त्याचं नाव प्रसिद्ध केलेलं नाही.)
 
 
 
तिरकी नजर, तेढी जुबां
 
मी मध्य प्रदेशातल्या भोपाळजवळच्या गावातला. शिकलो भोपाळमधेच. पुण्यात आलो. मला सिनेमा बनवायचा होता. या संस्थेत सिनेमा बनवायला शिकवतात हेच माहिती होतं.
येऊन धडकलो!
मला मुळात पुणं झेपत नव्हतं, त्यात इथं अॅडमिशन घेतली. सुरुवातीला काही गोष्टी डोक्यातच जायच्या. विशेषत: मुलंमुलींमधे जो काही मोकळेपणा होता तो मला झेपायचा नाही!
तसा वरकरणी मी स्त्री-पुरुष समानता मानणारा, इंग्रजी माध्यमातून शिकलेला. पण आमच्याकडे ‘औरतजात’ मुळातच थोडी आपल्यापेक्षा कमी असते हे रक्तात असं काही भिनलेलं होतं की मला इथलं मुक्त वातावरण पचवेना!
त्यात मी इतके दिवस ज्या नजरेनं सिनेमा पाहत होतो, ती नजरही इथलं शिक्षण बदलायला निघाली होती. 
सिनेमा पाहण्याची एक परिभाषा असते. ती परिभाषा आपल्या डोक्यातल्या खिडक्या उघडून माणसांच्या कपडय़ांच्या आतले खरे चेहरे पाहायला शिकवते हादेखील माझ्यासाठी धक्का होता. ‘लिबासों के अंदर के नंगे इन्सान जैसे है वैसे उन्हे देखो, और जो है वो स्वीकार करो’ हे वाक्यसुद्धा माझ्या देहाती मनाला पटण्यापलीकडचं होतं.
पण इथल्या वातावरणानं ते पटवलंही, पचवलंही!
कारण इथल्या मुक्त चर्चा, इथला चालण्याबोलण्यातला आणि स्वीकारण्यातला खुलेपणा. इथे सिनेमा बनवण्याचं तंत्र तर शिकवतात, ते शिकतोच आम्ही; पण त्यापेक्षा महत्त्वाची एक गोष्ट शिकतो. मानवी व्यवहारातली गुंतागुंत पाहणं! 
स्वत:च्या मनावर गच्च बसलेल्या, किटण धरलेल्या भावना घासून बाजूला ठेवणं आणि जरा मोकळेपणानं विचार करणं, आणि तो विचार मोकळेपणानं मांडायची हिंमत करणं हे सारं मी या कॅम्पसमधे शिकलो. त्या शिकण्यातून जगाकडे पाहण्याची एक तिरकी नजर, परिस्थितीला प्रतिक्रिया देण्याची एक तेढी जुबानही माङया वाटय़ाला आपोआप आली.
माङयाच कशाला आमच्यापैकी अनेकांमधे हा तिरकसपणा येतही असेल किंवा आम्ही तिरकस अंतरंगी आहोत असं लोकांना वाटत असेल तर असेलही! पण ते सारं मस्तमौला, खुल्या वातावरणातून आणि तरीही डोक्याला खूप ताप देणा:या विचार करण्याच्या वृत्तीतून, स्वत:शी सतत चाललेल्या भांडणातून येतं!
मी शिक्षण संपवून बाहेर पडलो, त्याला आता वर्ष झालं. पण तरीही माङया डोक्यात हे सारं चालूच आहे. अजूनही असं वाटतं की, बाकी सारं बंद करावं आणि विजडम ट्रीच्या खाली फक्त जाऊन बसावं.
बाकी जे होईल ते होईल.
ही बेफिकिरी तर माझी खरी कमाई आहे..
- अमोल कुशवाहा
एफटीआयआयचा एक माजी विद्यार्थी
 
 
 
..............
(‘लोकमत’च्या पुणो आवृत्तीची रिपोर्टर म्हणून 
नम्रता एफटीआयआयचा संप ‘कव्हर’ करते आहे.)
 

Web Title: FTII ones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.