परके पंख, परके आकाश याला स्वातंत्र्य म्हणायचं का?

By admin | Published: November 27, 2015 09:10 PM2015-11-27T21:10:07+5:302015-11-27T21:10:07+5:30

सगळं माङो आईबाबाच ठरवतात. आणि त्यांच्या मनाप्रमाणो जगलो की म्हणतात.

False feathers, the parakeet sky is to say that freedom? | परके पंख, परके आकाश याला स्वातंत्र्य म्हणायचं का?

परके पंख, परके आकाश याला स्वातंत्र्य म्हणायचं का?

Next

 सगळं माङो आईबाबाच ठरवतात.

आणि त्यांच्या मनाप्रमाणो जगलो की
म्हणतात.
बघ, आम्ही तुला किती स्वातंत्र्य देतो!
 
परके पंख, 
परके आकाश 
याला स्वातंत्र्य 
म्हणायचं का? 
 
शाळेत होतो तेव्हा वाटायचं की कॉलेजात गेलं की थोडा मोकळा श्वास घेता येईल. आपल्या मनासारखं वागता येईल. कॉलेज म्हणजे आपल्या मनासारखं वागण्याचा परवाना. हा समज काही मी माङया मनानं करून घेतलेला नव्हता. माङो आई-बाबाच मला म्हणायचे, ‘कॉलेजात गेला की तू तुङो निर्णय घ्यायला मोकळा. तुला योग्य वाटेल ते तू कर. आम्ही ढवळाढवळ करणार नाही.’ परफॉर्मन्सची तलवार डोक्यावर ठेवून आई-बाबांनी दिलेलं आश्वासन म्हणजे तुरुंगातून मुक्त होण्याची वर्दी वाटत होती. वाटलं, आई-बाबांना पाहिजे तसा परफॉर्मन्स दिला की आपली पावलोपावली होणा:या सूचनांच्या जंजाळातून सुटका होणार..
पण कसलं काय? कॉलेजचं निम्म वर्ष संपलं माझं. पण एक पाऊलही मनानं टाकता आलं नाही. साइडपासून मित्रर्पयत आणि शर्टपासून पिक्चर्पयत सर्व काही आई-बाबाच ठरवताहेत अजूनही. दहावीत मार्क चांगले पडलेत म्हणून सायन्स घ्यायला लावलं. मला आर्ट्सला जायचं होतं. पण माङया इच्छेला ‘अवदसा’ म्हणून हिणवलं गेलं. ‘याला आयुष्यभर आपल्याच कमाईवर जगायचं दिसतंय’ अशी त्यांना वाटणारी भीती त्यांनी माङयासमोर बोलून दाखवली. माझा इलाज नव्हता. सायन्सला गेलो. परत एकदा कॉलेज-क्लास आणि अभ्यासाच्या गुंतावळ्यात गुंततच गेलो. 
शाळेत असताना गॅदरिंगमधे भाग घ्यायचो. नाचायचो आणि नाटकही छान करायचो. माङयातलं टॅलण्ट अभ्यासाच्या ओङयानं मरायला नको म्हणून त्याचीही काळजी सुरू झाली. परत एकदा माङया इच्छेविरुद्ध माङया आधीच बिझी असलेल्या शेडय़ूलमधे अॅक्टिंग क्लास कसाबसा बसवून टाकला. तिकडेही निमूटपणो जाणं आलं. कॉलेजला गेलो तरी अंगानं भरलो नाही. अशी अंगकाठी कॉलेजात जाताना शोभत नाही म्हणून बळजबरीनं सकाळी जिमला पाठवणंही सुरू झालं. 
जिम, कॉलेज, क्लास, हॉबी क्लास यामुळे दिवसातले तेरा चौदा तास माङो घराच्या बाहेरच जातात. कोणालाही वाटेल किती मोकळीक आणि स्वातंत्र्य अनुभवत असेल हा. पण कसलं काय. खिशात स्मार्टफोन ठेवलाय माङया. तोही त्यांच्याच पसंतीच्या ब्रॅण्डचा. दर तासा-दोन तासाला कुठे आहे, काय करतोय, कोणत्या मित्रसोबत आहे यांसारखे प्रश्न विचारून भंडावून सोडतात मला माङो आई-बाबा.
निसरडं वय. वाईट संगतीनं माझं मन भरकटायला नको म्हणून मित्रंची निवडही आई-बाबांनीच केलीय. पिक्चरला जायचं असेल तर कोणता पिक्चर माङया मनावर चांगला परिणाम करेल आणि कोणत्या मूव्हीचे माङया मनावर वाईट परिणाम होतील हे याचा अभ्यास करूनच अमुक एखादा चित्रपट पाहा याचं स्वातंत्र्य मला दिलं जातं. 
माङया आजूबाजूची अशी सगळी हवा टाइट आहे.  मनासारखं जगायची खूप इच्छा आहे. पण काय करू?  आई-बाबा देत असलेलं मर्यादित स्वातंत्र्य मला आता ङोपत नाही हे त्यांना कसं पटवून देऊ? 
मला माहीत आहे की आता जर मी माङया मनाप्रमाणो माङया आकाशात उडालो नाही तर माङो पंख कायमचे झडून जातील. 
सगळं कळतंय मला. पेटून उठावंसं वाटतंय. आई-बाबांच्या हट्टाला विरोध करावासा वाटतोय. पण ताकदच येत नाही माङयात.  
पण लढायचं हे तर नक्की आहे. मी माङया पंखात बळ भरायला सुरुवात केली आहे. माझं आकाश कोणतं हे मला माङया आई-बाबांना दाखवून द्यायचं आहे.  माङयात अजून हिंमत नाही, पण विश्वास आहे मला कधीतरी माङया मनाप्रमाणो जगता येईल!
 
- अंकित 
कोल्हापूर

Web Title: False feathers, the parakeet sky is to say that freedom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.