डायरेक्ट दिल से

By Admin | Published: May 26, 2016 11:34 PM2016-05-26T23:34:04+5:302016-05-26T23:34:32+5:30

वरातीत, गणपतीत नाचतात त्या नाचण्याला कुणी ‘डान्स’ म्हणोल आणि त्या प्रकारच्या शैलीचं एकदम कौतुक होत ‘रॉ डान्स’मधल्या कमाल एनर्जीची चर्चा होईल असं एरवी कुणाला वाटलं असतं का?

Direct from the heart | डायरेक्ट दिल से

डायरेक्ट दिल से

googlenewsNext

 - संदीप आडनाईक

वरातीत, गणपतीत
नाचतात त्या नाचण्याला कुणी
‘डान्स’ म्हणोल आणि त्या प्रकारच्या
शैलीचं एकदम कौतुक होत
‘रॉ डान्स’मधल्या कमाल एनर्जीची
चर्चा होईल असं एरवी कुणाला वाटलं असतं का?
पण सध्या या गावठी नाचण्याची धम्माल क्रेझ आहे
आणि पबवालं क्राऊड आता या रॉ डान्सवर थिरकत आहे.
त्या एनर्जीची, बिंधास्तपणाची एक
कडक बजाव ष्टोरी!
 
 
 
नाचो रे म्हणत नाचणारा एक बेफिक्रा आनंदी मामला!
तुम सब वो डान्स करोगे, जो पुरा इंडिया करता है.
वो डान्स जो सब को बनाता है, करीब लाता है.
वो डान्स जिसे देख के चूपचाप बैठ नहीं सकते, 
जो सबको नाचने पे मजबूर कर देता है.
वो डान्स.
जो सालों से करते आये हो, हमेशा करते हो, 
शादीयों में करते हो, इंडिया जब क्रिकेट मॅच जितता है तब करते हो,
गणपती विसर्जन में करते हो.
वो एक डान्स जो डिसिप्लिन से नहीं होता.
होता है सिर्फ दिल से.
एबीसीडी.
एनी बडी कॅन डान्स.
- प्रभुदेवाचे हे शब्द आठवतात. एबीसीडी नावाच्या सिनेमात डान्स कॉम्पिटिशन जवळजवळ हरलेल्या त्याच्या तरुण शिष्यांना तो एवढंच सांगतो. म्हणतो, नाचा, मनापासून नाचा. जसं हवं तसं नाचा, फक्त ते नाचणं पाहून तुमच्याबरोबर सारं जग नाचलं पाहिजे. ज्याला नाचता येत नाही तोही मनापासून थिरकत नाचू लागला पाहिजे.
आणि मग बाप्पा मोरया म्हणत त्याचे शिष्य जो गणपती डान्स करतात त्यानं आपणही डोळ्यात पाणी आणून नाचू लागतो. आणि असं नाचतो ज्या नाचाचं शिक्षण घ्यावं लागत नाही, त्यासाठी ठेका कळावा लागत नाही, शिस्त लागत नाही, लागते फक्त इच्छा. स्वत:सह सा:या जगाला विसरून मनसोक्त नाचण्याची, आपल्यातच हरवून जाण्याची!
असं नाचणं खरंतर आपल्याकडे नवीन नाही. आपण सारे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतही असेच नाचतो, मित्रच्या लगAाच्या वरातीतही असेच पतंग उडवतो आणि भारतानं मॅच जिंकली तर फटाके उडवत भर रस्त्यात असेच नाचत सुटतो. आपला आनंद आणि हे बिंधास्त नाचणं हे समानार्थी शब्द असावेत असं आपण नाचतो.
या नाचण्याची, म्हणजे सध्याच्या परिभाषेत सांगायचं तर ‘रॉ डान्स’ची चर्चा आहे ती सैराटच्या ङिांगाट गाण्यामुळे! त्या गाण्यात सिनेमात जे नृत्य केलं गेलंय ते काही शिस्तबद्ध, कोरिओग्राफ केलेलं नृत्य नाही. गावाकडे पोरं जशी बिंधास्त कुणाच्याही लग्नाच्या वरातीत घुसून नाचतात आणि पार येडी होत सुसाट नाचतात तसं हे गाणं! जगाचं भान नसलेली, आपल्यासाठीच नाचणारी ही वरात पाहून बाकीचेही ङिांग ङिांग ङिांगाट झाले. आता तर काय अमेरिकेत कुठल्याशा थेटरात नाचणारी तरुण पिढी, कुठं पबमध्ये नाचणारी हायफाय गर्दी, कुणी कारमध्ये बसलेली एखादी तरुण मुलगी, बसल्याजागी थिरकणारी असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आणि जमेल तशी तरुण जनता या ङिांगाट गाण्यावर आपल्याला जमतं तसं नाचून घेत आहे. छोटय़ा शहरातल्या थेटरात तर पिक्चर पाहताना तरुण पोरांनी हा राउडी किंवा गावठी डान्स पार स्क्रीनजवळ, स्टेजवर जाऊन करायला सुरुवात केली. आली लहर केला कहर, असं म्हणत पोरं (आणि पोरीही) नाचू लागली.
 यापूर्वीही मराठी, हिंदीतील अनेक गाण्यांवर लोकं नाचली आहेत. पिटातल्या प्रेक्षकाला नाचावंसं वाटावं अशी काही गाणी आजवर बरीच गाजली. त्यांना डोक्यावर घेत तरुणांनी धांगडधिंगाही घातला. वरातीच्या पुढय़ात नाचण्यासाठी पूर्वी ठरावीक गाणीच बँडवाले वाजवत असत. त्यातील शब्द कळले, न कळले तरी केवळ संगीताच्या तालावर लोक बिंधास्त डान्स करतातच. साऊथवाली अशी कितीतरी गाणी वरातीत ढिंच्याक वाजतात. वरातीत नाचणारे काही नशापाणी करूनही नाचतात. पण सगळेच काही तसे नाही. काहींना बेभान होऊन नाचायला आवडतंच. गाणं कुठलं, स्टेप्स काय, कोण कसं नाचतंय याच्याशी काहीच देणंघेणं नाही. कोणीही, कुठेही, कसेही नाचा आणि मस्त मोकळा श्वास घेत, मनावरची ओझी अन् समाजाचे संकेतबिंकेत भिरकावून द्या इतका साधासोपा अर्थ या नाचणा:या तरुण गर्दीकडे पाहून कळतो. देहभान विसरून नाचणं म्हणजे काय ते असं वरातीपासून गणपतीत नाचणा:यांकडे पाहूनही सहज कळतं.
हा राउडी किंवा गावठी डान्स तरुण जेव्हा करतात तेव्हा त्यांची एनर्जी लेवल कमालीची असते. एकदा ‘बजाव रेùù’ म्हटलं किंवा वाजायला लागलं की त्यांचे पाय थिरकायला लागतात. डोक्यात किती का वैताग असेना, ते सारं बाजूला ठेवून अनेकजण बेभान डान्स करतात. त्यातून त्यांना स्वत:साठी आनंद मिळवायचा असतो. मुळात ते डान्स करतात तोच  स्वत:साठी! त्यामुळे कोण आपल्याला पाहील का आणि पाहून काय म्हणोल, कौतुक करेल की शिव्या घालेल याची फिकीर कोण करत बसणार? 
म्हणून तर लग्नाच्या वरातीत, गल्ली-बोळात, चौकाचौकांत मेरे यार की शादी है म्हणत  बिंधास्त नाचणारे अनेक जण असतात. आणि ‘अरे याला बाहेर काढा, वरात पुढं न्या’ म्हणत ज्यांना वडीलधारे वरातीबाहेर ढकलतात असे नमुने तर अनेक वरातीत दिसतातच; पण त्यांना कितीही बाहेर काढा ते नाचतच असतात. आणि त्यांना पाहून बाकीच्यांना नाचण्याचा चेव चढतो. 
कोल्हापुरातील सार्थक क्रिएशन्स ही नृत्य अकादमी चालविणारे सागर बगाडे. ते सांगतात,   आम्ही नृत्य शिकविताना स्टेप्सला महत्त्व देतो, कोरिओग्रॉफ करत गाणी बसवतो. तेव्हा त्यात एक साचेबद्धता, शिस्तबद्धता असते. पण लोक जेव्हा असे स्वत:चे स्वत: नाचतात तेव्हा ती काही नृत्य शिकण्यासाठी नाचत नाहीत, तर स्वत:च्या आनंदासाठी, चिंता विसरण्यासाठी नाचतात. आपल्या काळजीचा निचरा करण्याचा हा सामान्य तरुणांचा एक मार्ग असतो. याच्याशी सहमत होत फूट ऑन बीट्स या डान्स अकॅडमीचे विजय शेलार सांगतात की, अनिल कपूरच्या तेजाब आणि राम लखन या चित्रपटातील ‘एक दो तीन’ तसेच ‘ए जी, ओ जी’ या गाण्यांवर त्याकाळची तरुण पिढी अशीच थेट थिएटरमध्ये नाचायची. अगदी अलीकडे आर्या या दाक्षिणात्य चित्रपटातील आ आंटे हे गाणंही तरुण मुलांनी असंच डोक्यावर घेतलं होतं. ज्यांना नाचायचं त्यांना योग्य ठेका सापडला की ते बिंधास्त नाचतात. रुद्रांश डान्स अकॅडमीचे कोरिओग्राफर दीपक बीडकर यांच्या मते डान्स हा उत्स्फूर्तपणो सादर करण्याचाच आविष्कार आहे. उत्तम डान्सची एकच व्याख्या आहे, ती म्हणजे प्रचंड ऊर्जा आणि उत्स्फूर्तता. त्यामुळे असं जर कुणी नाचत असेल तर केवळ त्यांनी नृत्य शिकलेलं नाही म्हणून त्याला कुणी कमी लेखू नये!
म्हणजेच काय, तर जो दिल से होता है तो डान्स. जो ख:या अर्थानं सारं भान विसरून स्वत:साठी थिरकत राहतो.
आज तशा नृत्याची चर्चा आहे आणि वरातीत तुफान नाचणा:या पोरांच्या नाचण्याचंही कौतुक होत असेल तर ही ‘बजाव रे’ म्हणत खूश होण्याचीच गोष्ट आहे.
 
 
 
 
    
 
 
तमाशा ते ङिांगाट
 मराठी चित्रपटाच्या सुवर्णयुगात तमाशापट खूपच लोकप्रिय होते. अनंत माने यांच्या सांगत्ये ऐका या चित्रपटातील बुगडी माझी सांडली गं या गाण्यावर खूपच दौलतजादा होत होती. त्यानंतर तमाशापटातील अनेक गाण्यांनी लोकप्रियता मिळविली आणि पिटातील प्रेक्षकांनी चिल्लर उधळली होती. आजचा प्रेक्षक अशी चिल्लर उधळण्याच्या मानसिकतेचा नाही. पण पूर्वी मास्टर भगवान यांच्या गाण्यावर नृत्य करत लोक थेटरात चिल्लर फेकत. भगवान यांचाच रोंबासोंबा नृत्यप्रकार पुढे अमिताभ बच्चन यांनी आत्मसात केली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जितेंद्र, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, अनिल कपूर, गोविंदा, यांच्या नृत्य शैलीची आवड असणाराही एक  तरुण वर्ग होता. आता सैराटमुळे पुन्हा एकदा राऊडी डान्सची चर्चा आहे. आणि साऊथवाले जसे एकच सीन, एकच गाणं सिनेमात अनेकदा वाजवतात तसंही काहीजण करत या गाण्यावर थेटरात नाचत आहेत.
 
 
 
कोरिओग्राफी इज डेड
  जगभरातले नर्तक आणि नृत्यप्रेमी आता हा प्रश्न विचारत आहेत की, गरज काय आहे कोरिओग्राफीची? अमेरिकन कोरिओग्राफर योन्नेनं हा प्रश्न पन्नासवर्षापूर्वीच विचारला होता की नृत्याला बांधून टाकत यंत्रवत रणा:या कोरिओग्राफीची गरजच काय? त्यापेक्षा ज्याला नाचायचंय त्यानं आपापले प्रयोग करत नाचावं,मनसोक्त नाचावं. नृत्य शिकणं वेगळं आणि ते करकचून स्टेप्सनी बांधणं वेगळं असं मत आतात अनेक नर्तक, कलाकार व्यक्त करत आहेत.
 आणि चर्चा सुरू आहे की, इज कोरिओग्राफी डेड?
 
 
सलमानचा दबंग डान्स
 गेल्या वर्षी गणपती विसर्जनाला सलमान खानने केलेल्या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल होता. एकदम दबंग स्टाईल नाचत सलमाननं  मुंबईत मिरवणूक नाचणा:या तमाम जनतेला खुश करुन टाकलं. एरव्हीही त्याच्या सिनेमात तो कसाही नाचतो आणि त्या नाचण्यावर फिदा होणारे अनेकजण आहेत. या क्रेझी डान्सचे फॅन्स जगभरात वाढत आहेत हे नक्की!
 
 
( लेखक ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)

Web Title: Direct from the heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.