दोष देण्याचा आजार

By admin | Published: September 3, 2015 09:39 PM2015-09-03T21:39:54+5:302015-09-03T21:39:54+5:30

एक आजी आणि तिचा तरुण नातू. दोघंच असतात. आजी कष्ट करकरून कसाबसा दोघांचा गुजारा करत असते.

Dangerous disease | दोष देण्याचा आजार

दोष देण्याचा आजार

Next
>- मन की बात
 
एक आजी आणि तिचा तरुण नातू.
दोघंच असतात. आजी कष्ट करकरून कसाबसा दोघांचा गुजारा करत असते.
तरुण नातू मात्र कायम आळसटासारखा बसून राहतो. काहीच काम करत नाही.
पण आजी त्याला काही बोलत नाही. काम कर म्हणत नाही.
इकडे तरुण नातू मात्र सतत म्हणतो की, काय हे आपलं नशीब. कायमच कसं आपल्याला काहीच मिळत नाही. आपणच कर्मदरिद्री.
आपलंच नशीब फुटकं.
आजी मात्र अशी कुरकुर न करता काम करत राहते.
एकदा एक साधू त्यांच्या घरी येतो.
ही अवस्था पाहून चक्रावून जातो.
शेवटी तोच आजीला म्हणतो की, मी असा साधूबिधू झालोय तरीही मला तुङया नातवाचा राग येतोय, मग तू का चिडत नाही?
आजी म्हणते, ‘सोपंय. जो दैवाला दोष देत, नुस्ता आळस करत, काहीही न करता बसून राहतो, फुकट खातो तो माणूस आजारी आहे असं समजावं. कारण जो माणूस मनानं आणि शरीरानं निरोगी आहे, तो कधीच असा इतरांना दोष देत नाही. तो झडझडून प्रयत्न करतो, परिस्थिती बदलवतो. त्यामुळे आजारी माणसाला माया द्यावी, त्याचा रागराग करून काय उपयोग. कधीतरी माझा नातू या आजारातून उठेल.
आणि तो बराच झाला नाही तर? - साधू विचारतो.
तर काय.?
संपेल तो.
दुसरं काय?
- आजी सांगते! 
मग यावर इलाज काय?
साधू विचारतो.
आजी हसते आणि म्हणते, जेव्हा माझा आधार संपेल तेव्हाच त्याला कळेल की जिवंत माणसांची साथ ही खरी पुंजी.
पण आजारात अजून काही कळत नाही त्याला तोवर असंच चालायचं.
साधू हसतो आणि निघून जातो.
जाताना त्या तरुणाला एकच सांगतो, ‘आजार सोड रे बाबा. दैवाला दोष देण्याचा आजार!’
 
( एका असमिया लोककथेचा अनुवाद)

Web Title: Dangerous disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.