.जा, चांद ले के आ!

By admin | Published: December 11, 2014 08:29 PM2014-12-11T20:29:48+5:302014-12-11T20:29:48+5:30

एकदम लांडा, पांढरा शुभ्र स्कर्ट घालून एक मुलगी पावसात नाचतेय. आईला कविता वाचून दाखवतेय. कवितेत म्हणते, ऐसा पहली बार हुआ है,

Come on, take the moon! | .जा, चांद ले के आ!

.जा, चांद ले के आ!

Next
>एकदम लांडा, पांढरा शुभ्र स्कर्ट घालून एक मुलगी पावसात नाचतेय.
आईला कविता वाचून दाखवतेय. कवितेत म्हणते, ऐसा पहली बार हुआ है, अनदेखा अनजाना कोई आने लगा खयालोमें. हे ऐकून तिची आई भडकत नाही, की हे असला लांडा स्कर्ट घालते, घरकाम करत नाही म्हणून कटकटत भाषण देत नाही, तर उलट विचारते, कोण गं तो? त्यावर ती सांगते, मां; अनजाना-अनदेखा आहे तो, मी पाहिलंय कुठं त्याला. मग ती आई मैत्रिणीसारखी खळखळून हसते. म्हणते, सपने देखो, जरुर देखो, बस उन्हे पुरे होने की शर्त मत रखो.
 -ती आई, ती लांड्या स्कर्टमधली काळीसावळीशी सिमरन, तिचं ते नाचणं, ते तिचं नाही, आपलं आहे, असं कितीदा वाटलं होतं तेव्हा. कट्टय़ावर मैत्रिणींनी एका सुरात म्हणायचं ते गाणं बनलं होतं.
‘मेरे ख्वाबो में जो आए, 
आके मुझे छेड जाए, 
उसे कहो,
मेरे सामने तो आए.’
असं म्हणत आकाशातल्या ढगाआड लपलेला आपल्यासाठीचा चेहरा जी ती शोधू लागे. कुणीतरी नक्की येईल आपल्या आयुष्यात असं वाटायला लावणारे आणि तो आला की त्याला सिमरनसारखाच माज दाखवू असा मनाचा खेळ रंगवणारे ते दिवस होते. त्यातही गंमत अशी, पूर्वीचे  सिनेमातले सारे प्रियकर भेटायला येताना फूल घेऊन यायचे, सिमरन नकचढी, नाक उडवत म्हणते, ‘कर बैठा भूल वो, ले आया फूल वो, उसे कहो जाए चांद लेके आए.’
आपण पण त्याला असं उडवूून लावू असं वाटण्याचे ते खुळे दिवस होते. आणि त्याच दिवसात तिला राज भेटतो, तिच्यासाठी थेट विदेशातून येतो. तिच्या घरी राबतो, सांगतो तिला, एक अंगुठी पहनाकर कोई उल्लू का पठ्ठा तुम्हे मुझसे जुदा नहीं कर सकता. आणि कधी तिच्यासाठी करवा चौथचा उपवास करतो, तिला कळूही न देता उपाशी राहतो.
त्याचा रोमान्स, त्याचं प्रेम, तिचं त्याच्यापायी वेडं होऊनही संयम ठेवणं. हे सारं आपल्याही आयुष्यात घडेल, असं का वाटत होतं देवजाणे त्या दिवसांत.
पण वाटत होतं खरं. इतकं की, आमच्या ग्रुपमधले प्रेमात पडलेलेही राज- सिमरनसारखेच एकमेकांसाठी वाट्टेल ते करायला तयार होत होते. पळून न जाता, घरच्यांशी पंगा घ्यायचं ठरवत होते.

Web Title: Come on, take the moon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.