बारटेंडर - नाईटलाइफचे सरताज

By admin | Published: May 30, 2014 10:52 AM2014-05-30T10:52:49+5:302014-05-30T10:52:49+5:30

‘बारटेंडर’ हा शब्द तसा परिचित वाटेल तुमच्या कानाला.‘बार’ या शब्दाशी नातं आहेच त्याचं, सिनेमात अलीकडे तुम्ही पाहिलंही असेल त्याला.

Bartender - Nightlife's Sheraton | बारटेंडर - नाईटलाइफचे सरताज

बारटेंडर - नाईटलाइफचे सरताज

Next
>पब-डिस्कसह पार्टी कल्चरमधले खास करिअर
 
 
‘बारटेंडर’ हा शब्द तसा परिचित वाटेल तुमच्या कानाला.‘बार’ या शब्दाशी नातं आहेच त्याचं, सिनेमात अलीकडे तुम्ही पाहिलंही असेल त्याला.
फाइव्ह स्टार पब-डिस्कमध्ये जी व्यक्ती अत्यंत सफाईनं विविध प्रकारचे ‘ड्रिंक्स’ ग्राहकांना सर्व्ह करते. विविध हस्तकौशल्य, करामती करते, ती व्यक्ती (विशेषत: पुरुष) म्हणजे बारटेंडर. त्यांना बारकीप, बारमॅन, बारमेड आणि मिक्सोलॉजिस्ट असेही पर्यायी शब्द आहेत.
सोप्यात सोपं सांगायचं तर पब-डिस्कमध्ये जे ड्रिंक्स सर्व्ह करतात, बार सांभाळतात त्यांना बारटेंडर म्हणतात.
लगेच भुवया उंचावून विचारू नका, म्हणजे काय लोकांना दारूच सर्व्ह करायची ना, त्यात काय करिअर असणार आहे.?
मात्र नव्या बदलत्या लाइफस्टाइलच्या काळात आणि पब-डिस्कच्या चकचकाटात ‘बारटेंडर’ हे अत्यंत प्रोफेशनल आणि प्रशिक्षित काम उदयाला येत आहे. विविध प्रकारची हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेस्टो-बार्स, पब्ज, नाईटक्लब्ज या ठिकाणी बारटेंडर हे अत्यंत मानाचे आणि कौशल्याचे काम मानले जाते. विविध प्रकारचं मद्य उत्तम प्रकारे मिक्स करून त्याचं कॉकटेल बनवण्याचं कामही हे बारटेंडर करतात. म्हणूनच तर त्यांना मिक्सॉलॉजिस्ट असंही म्हणतात.
बारटेंडरपासून सुरुवात करून, बार मॅनेजर, कॉर्पोरेट बार मॅनेजर या पदापर्यंत फाइव्ह स्टार हॉटेलच्या विविध साखळी व्यवसायात काम करता येऊ शकतं. मुख्य म्हणजे नोकरीच करायला पाहिजे असं काही कम्पलशन नाही, फ्रीलान्स बार टेंडर म्हणूनही काम करता येऊ शकतं. हातात उत्तम स्किल असणार्‍या आणि स्वत:ची एक ओळख निर्माण करणार्‍या फ्रीलान्स बारटेंडरना नव्या पार्टी कल्चरमध्ये विशेष मागणी आहे.
 
बारटेंडर कोण असतात?
कुठल्याही पार्टीत, नाईट क्लबमध्ये ड्रिंक्स सर्व्ह करणारी ही व्यक्ती. अत्यंत टापटीप प्रोफेशनल पोशाखात असते. विविध प्रकारच्या मद्यांचे त्यांना उत्तम ज्ञान असते. त्यांच्या मिश्रणातून उत्तम ड्रिंक बनवणं जमतं. पार्टीच्या मूडप्रमाणं त्यांचा प्रसन्न वावर असतो. अत्यंत वेगळे, वेगळ्या चवीचे ड्रिंक्स बनवणं हा तर अनेकांचा हातखंडा असतो. वाईन नावाचं एक कल्चर आहे, त्या कल्चरप्रमाणं त्यांचा वावर असतो. उत्तम संवादकौशल्य, पर्सनॅलिटी, पेशन्स त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे. ट्रेनी म्हणून कामाला सुरुवात करता येते, पुढे स्वतंत्र व्यवसायही करता येतो.
 
 
प्रशिक्षण कुठे?
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बारटेंडिंग 
http://www.iibtindia.com/
(या साइटवर तुम्हाला भारतभर चालणार्‍या बारटेंडिंग कोर्सेसची सर्व माहिती मिळू शकेल.) 
इंडियन प्रोफेशनल बारटेंडिंग अकॅडमी
 http://www.ipba.in/contact.html
(या साइटवरही तुम्हाला बारटेंडिंग कोर्सेसची सर्व माहिती मिळू शकेल.) 
 

Web Title: Bartender - Nightlife's Sheraton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.