अंदर कुछ भी हो, बाहरसे खुबसुरत!

By Admin | Published: May 14, 2014 02:22 PM2014-05-14T14:22:54+5:302014-05-14T14:22:54+5:30

भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दरवर्षाला सरासरी अठ ते नऊ टक्के राहील आणि २0२२ पर्यंत टप्प्याटप्प्यानं ५0 कोटी रोजगार संधी देशातल्या कुशल कामगारांसाठी निर्माण होतील.

Anything inside, outsider outdoors! | अंदर कुछ भी हो, बाहरसे खुबसुरत!

अंदर कुछ भी हो, बाहरसे खुबसुरत!

googlenewsNext
भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दरवर्षाला सरासरी अठ ते नऊ टक्के राहील आणि २0२२ पर्यंत टप्प्याटप्प्यानं ५0 कोटी रोजगार संधी देशातल्या कुशल कामगारांसाठी निर्माण होतील, असं नॅशनल स्कील डेव्हलपमेण्ट कॉर्पोरेशनचा अभ्यास सांगतो. 
वेगानं विस्तारणारी आणि ज्यात सर्वाधिक व्यवसाय संधी निर्माण होतील हे सांगणारी जी क्षेत्रं त्यांनी निवडली आहेत त्यांचं हे एक फ्युचर प्रोजेक्शन. 
कोणत्या क्षेत्रात किती रोजगार निर्माण होतील हे सांगणारा हा एक अंदाज.
 
वर्ष                       वृद्धी दर    शेती                        उद्योग                     सेवाक्षेत्र                एकुण
२0१६ ते  २0१७       ९%        २४ कोटी २ लाख    १२ कोटी ६२ लाख    १८ कोटी ९५ लाख    ५५ कोटी ५९ लाख
 
२0२२ : कुठल्या क्षेत्रात किती जॉब्ज?
 
टेक्स्टाईल अँण्ड क्लोदिंग - २ कोटी ६२ लाख
बिल्डिंग अँण्ड कन्स्ट्रक्शन - ३ कोटी ३0 लाख
ऑटो अँण्ड ऑटो कम्पोनण्ट - ३ कोटी५0 लाख
ऑर्गनाईज्ड रिटेल - १ कोटी ७३ लाख
जेम्स अँण्ड ज्वेलरी - ४३ लाख
लेदर अँण्ड लेदर गुडस् - ५३ लाख
फर्निचर अँण्ड फर्निशिंग - ३४  लाख
इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड आयटी हार्डवेअर  - ३३ लाख
 
प्रशिक्षण कुठं मिळेल?
 
१. कुशल मनुष्यबळ हवं, काम मागणार्‍या हातांना स्कील हवं, अशी चर्चा कितीही केली तरी महत्त्वाचा प्रश्न उरतोच की ही कौशल्यं शिकण्यासाठीचं प्रशिक्षण कुठं मिळेल?
२. खरंतर वेगानं विस्तारत जाणार्‍या या सर्व क्षेत्रांसाठी स्कील शिकवणारे अभ्यासक्रम आपल्या जवळच्या आयटीआयमध्येही बहुतांश उपलब्ध आहेत. 
३. बहुतेक सर्व कोर्सेस सरकारी आयटीआयमध्ये शिकवले जातात. त्यासाठी तुमच्या जवळच्या सरकारी आयटीआयमध्ये संपर्क करा. 
४. अनेक अभ्यासक्रमांना आठवी-दहावी उत्तीर्ण याच पात्रतेवर प्रवेश मिळतो. त्यामुळे यंदा दहावीचा निकाल लागला की ही चौकशी स्थानिक संस्थांमध्ये करता येईल. दहावीच्या निकालानंतरच प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होतो. 
५. लक्षात फक्त एकच ठेवायचं की, हमखास नोकरी मिळवून देतो असं आमिष दाखवून जे लोक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या म्हणतात त्यांना भुलायचं नाही, शक्यतो मान्यताप्राप्त, सरकारी संस्थातूनच खात्री करून प्रशिक्षण घेणं उत्तम.

 

Web Title: Anything inside, outsider outdoors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.