अँनिमल थेरपिस्ट -प्राण्यांना ट्रेनिंग देत माणसांवर उपचार

By admin | Published: May 30, 2014 11:01 AM2014-05-30T11:01:18+5:302014-05-30T11:01:18+5:30

बरं व्हायचंय ना पटकन, मग रोज ठरावीक वेळ कुत्रा, मासे किंवा अगदी माकड, कासव, पोपट यांच्या सहवासात रहा.

Animal therapist - Trainings on the people giving training to animals | अँनिमल थेरपिस्ट -प्राण्यांना ट्रेनिंग देत माणसांवर उपचार

अँनिमल थेरपिस्ट -प्राण्यांना ट्रेनिंग देत माणसांवर उपचार

Next
माणसांवर उपचार करण्यासाठी पशू-पक्ष्यांची मदत घेणारी नवीन शाखा
बरं व्हायचंय ना पटकन, मग रोज ठरावीक वेळ कुत्रा, मासे किंवा अगदी माकड, कासव, पोपट यांच्या सहवासात रहा.
असा सल्ला एखाद्या डॉक्टरनं दिलाच.
तर पटकन विश्‍वास ठेवाल तुम्ही?
‘अँनिमल-असिस्टेड थेरपी’ अर्थातच पशू-पक्षी उपचारपद्धती नावाच्या एका नवीन ‘थेरपी’चा सध्या जगभर बोलबाला आहे. 
पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारी अनेक माणसं आपल्या अवतीभोवती असतात. आपल्या लाडक्या ‘पेट्स’बरोबर हसतात, रडतात. तासन्तास त्यांच्याशी गप्पा मारतात. पण हेच पाळीव प्राणी एखाद्या आजारात उपचारासाठी मदतीला येऊ शकतात, याची माहिती आपल्याकडे अजून फारशी कुणाला नाही.
मात्र जगभर या विषयात संशोधन सुरू आहे. प्रत्येक प्राण्याला त्याचं त्याचं म्हणून एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. त्याचा स्वभाव असतो. माया देण्याची त्याची म्हणून एक स्वतंत्र पद्धत असते. मात्र एक नक्की की, माणसांचे चांगले दोस्त होण्याचं काम हे पाळीव प्राणी करू शकतात.
त्यातूनच विकसित झालेली ही उपचारपद्धती.
आजारी वयोवृद्ध माणसं, दुर्धर आजार झाल्यानं आत्मविश्‍वास गमावून बसलेले रुग्ण. स्वमग्न, गतिमंद बालकं, हृदयविकार, डिप्रेशन, मोठय़ा मानसिक आघातात आत्मविश्‍वास हरवून बसलेल्या व्यक्ती, लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या व्यक्ती, यांच्यावर उपचार करण्यासाठी या पशू-पक्षी सहाय्यित उपचारपद्धतीची सध्या जगभर मदत घेतली जाते.
 
अॅनिमल थेरपिस्ट कोण असतात?
आता असे उपचार करायचे तर माणसांची मनं समजणारी आणि पाळीव प्राण्यांना माया करायला शिकवणारी प्रोफेशनल माणसं हवीत. तसे प्रोफेशनल असतात त्यांना म्हणतात अँनिमल थेरपिस्ट.
म्हणजे काय तर ज्याप्रकारे पेट ट्रेनर असतात, जे पाळीव प्राण्यांना विविध गोष्टी शिकवतात. तसेच हे अँनिमल थेरपिस्ट. जे विविध प्राण्यांनाही माणसांच्या भावनांना सकारात्मक प्रतिसाद देण्याचे ट्रेनिंग देतात. विशेषत: विविध प्रजातींचे श्‍वान, मांजरी, माकडं, घोडे यांना यासाठी विविध प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि त्यांच्या मदतीनं माणसांवर उपचार केले जातात.
पेट ट्रेनरच चांगला अँनिमल थेरपिस्ट होऊ शकतो. पण अनेकदा पेट ट्रेनर वेगळा अािण अँनिमल थेरपिस्ट वेगळा अशीही कामची वाटणी करता येऊ शकते. अनेक मानसोपचार तज्ज्ञही आता या उपचारपद्धतीची मदत घेत आहेत. या पाळीव प्राण्यांच्या सहवासात माणसांना ठेवून त्यांच्या वर्तनात अपेक्षित सुधारणा घडवून आणणं, आत्मविश्‍वास वाढवणं, एकटेपणावर उत्तर शोधणं असे प्रयत्न या उपचारातून करता येतात.
मानसशास्त्राचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही एक नवीन वाटच आता खुली होत आहे.

स्कोप काय?
 
१) पेट ट्रेनर म्हणून काम करणार्‍या आणि मानसोपचाराची आवड असणार्‍यांसाठी या क्षेत्रात संधी आहे.
२) अँनिमल बिहेव्हिअर या विषयात बीएस्सी करणार्‍यांनाही यात स्कोप आहे.
३) विविध प्रकारचे मानसोपचार करणार्‍या संस्थांत कामाची संधी मिळू शकते.
 
प्रशिक्षण कुठे मिळेल?
भारतीय संदर्भात हा विषय नवीन आहे, आपल्याकडे अजून या विषयाचे प्रशिक्षण उपलब्ध नाहीत. मात्र इंटरनेटवर या विषयातील बरीच माहिती उपलब्ध आहे.
 

 

Web Title: Animal therapist - Trainings on the people giving training to animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.