11 वचनी शपथ

By admin | Published: September 3, 2015 09:31 PM2015-09-03T21:31:50+5:302015-09-03T21:31:50+5:30

राष्ट्रपती म्हणून नाही, शास्त्रज्ञ म्हणून नाही, तर मला एक उत्तम शिक्षक म्हणून लोकांनी ओळखावं, असं जे म्हणत ते पूर्व राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम आझाद आता आपल्यात नाहीत.

11 verbal oaths | 11 वचनी शपथ

11 वचनी शपथ

Next

 शिक्षक आहात?

शिक्षक व्हायचंय?
मग डॉ. कलामांनी
शिक्षकांना दिलेली ही शपथ लक्षात ठेवाच.
 
निमित्त शिक्षक दिनाचं! तरुण शिक्षकांसाठी आदर्श वाटेवरची ही काही मार्गदर्शक तत्त्वं!
 
राष्ट्रपती म्हणून नाही, शास्त्रज्ञ म्हणून नाही, तर मला एक उत्तम शिक्षक म्हणून लोकांनी ओळखावं, असं जे म्हणत ते पूर्व राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम आझाद आता आपल्यात नाहीत.
पण उद्याच्या शिक्षण दिनाच्या पाश्र्वभूमीवर त्यांची आठवण येणं हे अपरिहार्य आहे. मुलांशी संवाद साधून त्यांची मनं चेतवण्याचं, त्यांना उमेदीचं एक अक्षय स्वप्नच देण्याचं नितांत सुंदर काम डॉ. कलामांनी केलं.
आपला शिक्षक कसा असावा अशी कल्पना केली तर अनेकांना तो डॉ. कलामांसारखाच असावा असं वाटावं. आणि आपण शिक्षक झालोच तर ते त्यांच्यासारखंच व्हावं असं स्वप्न पाहावं असं ते आपल्यासमोरचं अत्यंत आदर्श उदाहरण आहे!
उद्या शिक्षक दिन.
तरुण मुलं आपल्या शिक्षकांविषयी बोलतील. त्यांना आदर्श मानून त्यांच्यासारखं होऊ पाहतील किंवा नाहीदेखील. आणि जे स्वत: शिक्षक हा पेशा म्हणून स्वीकारतील तेही कसे पाहतील या व्यवसायाकडे हा वादाचा विषय असेलही.
पण निदान या दोन्हींसमोर काही आदर्श राहावा.
आपल्या पायाखाली कुठली वाट असावी हे आपल्याला माहिती असावं, कशी वाट आपण निवडावी हे आपल्याला माहिती असावं म्हणून तरी उद्याच्या शिक्षकदिनी आपल्यासमोर काहीतरी ठोस आणि ठळक व्हावं.
कधी आलंच कलकलून तर आपल्यासमोर ती गाइडलाइन कायम राहावी.
म्हणून पुन्हा डॉ. कलामांनी सांगितलेलीच सूत्रं आपल्या डोळ्यासमोर असावीत.
विशेषत: तरुण शिक्षकांसाठी.
खेडय़ापाडय़ात प्राथमिक शाळांत शिकवणारे, माध्यमिक हायस्कुलात कमी वेतनात झगडणारे, बडय़ाबडय़ा शिक्षण संस्थांमधे कसेबसे चिकटून आपलं भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करणारे, बिनपगारी, कमीपगारी आणि पार्टटाइमही. जे आपलाच संघर्ष करताहेत. आपलीच जिंदगी कठीण टप्प्यातून बाहेर काढताहेत. कधी निराशही होताहेत. आणि कधी अनेक प्रयोग करत आहे त्याच व्यवस्थेत नवे रंग भरताहेत.
त्या सा:याच तरुण शिक्षकमित्रंसाठी ही सूत्रं फार महत्त्वाची आहेत.
आपलं शिक्षक असणं हा आपला अभिमान असला पाहिजे. आणि आपण आपल्या देशाचं भवितव्य घडवतोय असंही आपल्याला वाटलं पाहिजे.
म्हणून त्या सूत्रंची आज ही आठवण.
डॉ. कलामांनी शिक्षकांसाठी निवडलेल्या 11 मुद्दय़ांची ही शपथ!
 
 
1) सर्वप्रथम आणि कायमच मी शिकवण्यावर मन:पूत प्रेम करीन! शिकवणं हाच माझा आत्मा असेल!
2) विद्याथ्र्याना घडवणं हेच फक्त माझं काम नाही, तर त्यांची मनं चेतवणं, त्यांना प्रेरणा देणं ही माझीच जबाबदारी आहे हे मी कायम लक्षात ठेवीन! चेतलेली तरुण मुलं ही पृथ्वीवरची सगळ्यात महत्त्वाची आणि बलशाली शक्ती आहे, त्या शक्तीला विधायक मार्ग सांगणं ही माझी जबाबदारी! शिकवणं हे मी कायम एक मिशन म्हणून स्वीकारीन!
3) मी साधासुधा नाही उत्तम शिक्षक होईन आणि अत्यंत सर्वसाधारण मुलाची अधिक चांगली तयारी करून घेऊन तो उत्तम कामगिरी करू शकेल इतपत मार्गदर्शन करीन!
4) मी माङया विद्याथ्र्याशी प्रेमानं वागेन, आईच्या मायेनं त्यांना शिकवीन. बहीण, भाऊ, प्रसंगी वडील बनून त्यांना स्नेहानं शिकवीन!
5) मी फक्त पुस्तकी संदेश देणार नाही, तर माङया स्वत:च्याच आयुष्याला असा आकार देईन की माझं आयुष्यच मुलांसाठी एक संदेश, एक उत्तम आदर्श ठरेल!
6) मी माङया विद्याथ्र्याना गप्प बस असं म्हणणार नाही, तर मी त्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी आणि प्रोत्साहन देईन. त्यांच्या उत्सुकतेला चालना देईन म्हणजे ते जागरूक, विचार करणारे नागरिक बनतील!
7) माङयासाठी माङो सर्व विद्यार्थी समान असतील. धर्म, भाषा, वर्ग यानुसार मी माङया विद्याथ्र्यामधे कुठलाही भेदभाव करणार नाही.
8) मी स्वत:च्या शिक्षणाचा दर्जा कायम उंचावत राहीन, स्वत:त सुधारणा करीन जेणोकरून माङया विद्याथ्र्याना कायम उत्तम दर्जाचं शिक्षण मिळेल!
9) माङया विद्याथ्र्याचं यश मी कायम उत्साहानं, त्यांच्यापेक्षा जास्त आनंदानं साजरं करीन!
10) मी शिक्षक म्हणून राष्ट्रनिर्माणाच्या उपक्रमात अत्यंत महत्त्वाचं योगदान करतो आहे याची मला जाणीव आहे.
11) मी स्वत: चांगले विचार करीन. माङया मनात सकारात्मकता ठेवून कायम चांगल्या गोष्टींचाच प्रचार करीन. तसाच वागेनही! माङया विचारात आणि वर्तनात मी कायम चांगुलपणाच ठेवीन!

 

Web Title: 11 verbal oaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.