द. आफ्रिकेची आज विंडीजशी ‘टक्कर’

By Admin | Published: February 27, 2015 12:34 AM2015-02-27T00:34:31+5:302015-02-27T00:34:31+5:30

आक्रमक फलंदाजीचा ‘बादशाह’ ख्रिस गेल याला सूर गवसल्यानंतर आत्मविश्वासाचा संचार झालेल्या वेस्ट इंडीजशी आज, शुक्रवारी विश्वचषकाच्या ‘ब’ गटात दोन हात करताना द

The West Indies 'collide' | द. आफ्रिकेची आज विंडीजशी ‘टक्कर’

द. आफ्रिकेची आज विंडीजशी ‘टक्कर’

googlenewsNext

सिडनी : आक्रमक फलंदाजीचा ‘बादशाह’ ख्रिस गेल याला सूर गवसल्यानंतर आत्मविश्वासाचा संचार झालेल्या वेस्ट इंडीजशी आज, शुक्रवारी विश्वचषकाच्या ‘ब’ गटात दोन हात करताना द. आफ्रिकेची पुरती दमछाक होऊ शकते. वेगाचा सम्राट डेल स्टेन विरुद्ध फटकेबाजी करण्यात तरबेज मानला जाणारा गेल यांच्यात चांगलीच जुगलबंदी होण्याची शक्यता आहे.
मागच्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेला १३० धावांनी नमविले. यामुळे दोन गुण घेणारा आफ्रिकेचा संघ ब गटात भारत, विंडीज आणि आयर्लंडच्या तुलनेत माघारला आहे. आफ्रिकेने मागच्या महिन्यात मायदेशात विंडीजचा ४-१ ने धुव्वा उडविला होता; पण झिम्बाब्वेर ७३ धावांनी मिळालेल्या विजयानंतर कॅरेबियन संघ उत्साहित आहे. ख्रिस गेलने या सामन्यात विक्रमी १६ षट्कारांसह २१५ धावा ठोकल्या होत्या.
मर्लोन सॅम्युअल्सनेदेखील १३३ धावांची खेळी करीत दोघांनी वन-डे क्रिकेटमधील ३७२ धावांच्या भागीदारीचा विक्रम केला. द. आफ्रिकेने विंडीजला पराभूत न केल्यास त्यांना उपांत्यपूर्व फेरीत धडक देण्यासाठी पुढील लढतीत आयर्लंड, पाक आणि यूएईवर विजय नोंदविणे क्रमप्राप्त ठरेल.
विश्वचषकात आफ्रिकेने पाचपैकी तीन सामन्यांत विंडीजला नमविले आहे. १९९२, १९९९ आणि २००७ च्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणाऱ्या आफ्रिका संघाला आज दबावातही आम्ही चांगले खेळू शकतो हे सिद्ध करावे लागेल.
कर्णधार डिव्हिलियर्स म्हणाला, ‘हा आमच्यासाठी मोठा सामना असून, कुठल्याही स्थितीत जिंकायचा आहे. आम्ही ताजेतवाने होऊन आलोत. माझा संघ मुसंडी मारेल, याबद्दल आश्वस्त आहे.’ (वृत्तसंस्था)

Web Title: The West Indies 'collide'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.