श्रीकांतचा डोळा जर्मन ओपन किताबवर

By admin | Published: February 27, 2017 10:39 PM2017-02-27T22:39:58+5:302017-02-27T22:39:58+5:30

गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत हा आज मंगळवारपासून येथे सुरू होत असलेल्या जर्मन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड

Srikanth's eye on the German Open book | श्रीकांतचा डोळा जर्मन ओपन किताबवर

श्रीकांतचा डोळा जर्मन ओपन किताबवर

Next

ऑनलाइन लोकमत

मुल्हेम(जर्मनी), दि. 27 -  गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत हा आज मंगळवारपासून येथे सुरू होत असलेल्या जर्मन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड कप बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपदाच्या निर्धाराने उतरणार असून पहिल्या किताबावर त्याची नजर राहणार आहे.
आॅगस्ट महिन्यात रिओ आॅलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळल्यानंतर श्रीकांतला जपानमध्ये खेळताना गुडघ्याला जखम झाली होती. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कोरिया सुपरसिरिजदरम्यान खेळताना ही जखम आणखी चिघळली.
श्रीकांत काही वर्षांपूर्वी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. स्पर्धेत त्याला १२ वे मानांकन लाभले असून सलामीला स्लोव्हाकियाच्या अ‍ॅलन रोझाविरुद्ध खळायचे आहे.
या स्पर्धेत अव्वल दहा स्थानावर असलेले सहा जण खेळताना दिसतील. त्यात आॅलिम्पिक चॅम्पियन चेन लोंग आणि महान खेळाडू लीन दान यांचा समावेश आहे.
पुरुष एकेरीत श्रीकांतशिवाय भारताचा राहुल यादव , हर्षिल दाणी, सिरिल वर्मा आणि शुभंकर डे हे देखील आव्हान सादर करणार आहेत. महिला एकेरीत तन्वी लाड हिला पहिल्या फेरीत नवख्या खेळाडूंविरुद्ध तर दुसऱ्या फेरीत आॅलिम्पिक चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारिनविरुद्ध खेळायचे आहे. पुरुष दुहेरीत फ्रान्सीस अल्विन- तरुण कोना भारतीय आव्हान सादर करतील.

Web Title: Srikanth's eye on the German Open book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.