रवींद्र जडेजा आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल

By admin | Published: March 21, 2017 01:12 PM2017-03-21T13:12:04+5:302017-03-21T13:29:14+5:30

रांचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात नऊ विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजा आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे

Ravindra Jadeja tops ICC rankings for Test batsmen | रवींद्र जडेजा आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल

रवींद्र जडेजा आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल

Next
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - रांचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात नऊ विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजा आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. जडेजाने आर अश्विनला मागे टाकत अव्वलस्थान पटकावलं आहे. रवींद्र जाडेजाने सात अंक मिळवत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. आयसीसी टेस्ट रँकिंमगध्ये श्रीलंकेचा रंगना हेराथ तिस-या स्थानावर आहे. त्यानंतर अमुक्रमे ऑस्ट्रेलियाचा जॉश हेजलवुड आणि इंग्लंडचा जेम्स एंडरसन आहेत.
 
रांची कसोटी सामन्याआधी आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या नावे 892 अंक होते. रांची कसोटीत एकीकडे इतर गोलंदाज विकेट घेण्यासाठी संघर्ष करत असताना रवींद्र जडेजाने मात्र आपल्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केलं. जाडेजाने रांची कसोटीत पहिल्या सत्रात पाच विकेट्स घेतले तर दुस-या सत्रात चार विकेट्स आपल्या नावे केल्या. भारताने पहिल्या सत्रात 152 धावांची आघाडी घेतली होती. मात्र शेवटी हा सामना अनिर्णितच राहिला. 
 
तिस-या कसोटी सामन्यात नऊ विकेट्स घेण्यासोबतच एकूण 21 विकेट्स घेत जडेजा मालिकेतही आघाडीवर आहे. पहिल्या सत्रात पाच आणि दुस-या सत्रात चार विकेट्स घेत जडेजाने एकूण सात अंक कमावले आहेत. भारतीय गोलंदाज बिशन बेदी आणि आर अश्विन यांच्यानंतर अव्वलस्थान पटकवण्याचा पराक्रम करणारा जडेजा तिसरा गोलंदाज आहे. 
 
जडेजाकडे सध्या 899 अंक असून आर अश्विनच्या 900 अंकांच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यापासून फक्त एक अंक दूर आहे. आऱ अश्विनकडे एकूण 904 अंक होते, मात्र रांचीत फक्त दोन विकेट्स मिळाल्याने 37 अंकाची घसरण झाली होती. 
 
ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या लढवय्या बाण्यापुढे रांची सामन्यात भारतीय गोलंदाजांना कसलीच कमाल करता आली नाही. स्टीव्ह स्मिथ अँड कंपनीने सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून मालिकेत रंगत कायम ठेवली. भारताने पहिला डाव ९ बाद ६०३ धावसंख्येवर घोषित केल्यानंतर रविवारी दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात २ बाद २३ अशी अवस्था झाली होती. आज त्यापुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ६ बाद २०४ धावांची मजल मारली असता, उभय कर्णधारांनी सामना अनिर्णीत संपल्याचे मान्य केले.
 
ऑस्ट्रेलियातर्फे पीटर हँड्सकोंब व शॉन मार्श यांनी निर्णायक भूमिका बजावली. हँड्सकोंब ७२ धावा काढून नाबाद राहिला, तर मार्शने ५३ धावांची खेळी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा पराभव टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
 
त्याआधी, कर्णधार स्टीव्ह स्मिथ (२१) व मॅट रेनशॉ (१५) यांना मोठी खेळी करता आली नाही. भारतातर्फे पुन्हा एकदा रवींद्र जडेजाने अचूक मारा करताना ५४ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. दुसऱ्या बाजूचा विचार करता ऑस्ट्रेलियातर्फे हँड्सकोंब २०० चेंडू खेळून नाबाद राहिला.
 
उपाहारापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा धोकादायक भासत होता; पण ऑस्ट्रेलियाने अखेरच्या दोन सत्रांत संयमी खेळी करून सामना अनिर्णीत राखला. मालिका आता १-१ ने बरोबरीत असून २५ मार्चपासून धरमशाला येथे चौथा व अखेरचा कसोटी सामना खेळला जाईल. 
 

Web Title: Ravindra Jadeja tops ICC rankings for Test batsmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.