आव्हान बळकट करण्यासाठी पंजाबला हवा विजय

By admin | Published: April 28, 2017 03:04 PM2017-04-28T15:04:32+5:302017-04-28T15:13:19+5:30

पंजाबला स्पर्धेतील आपले आव्हान मजबूत करण्यासाठी आयपीएल-१० मध्ये शुक्रवारी गतविजेत्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध विजय हवा आहे.

Punjab beat Windies to strengthen the challenge | आव्हान बळकट करण्यासाठी पंजाबला हवा विजय

आव्हान बळकट करण्यासाठी पंजाबला हवा विजय

Next

ऑनलाइन लोकमत

मोहाली : चांगल्या सुरवातीनंतर खराब फॉर्मचा सामना करीत असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबला स्पर्धेतील आपले आव्हान मजबूत करण्यासाठी आयपीएल-१० मध्ये शुक्रवारी गतविजेत्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध विजय हवा आहे.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायजर्सने आठ पैकी चार सामने जिंकले. आरसीबीविरुद्धची लढत पावसात वाहून गेल्याने त्यांना एक गुण मिळाला. हा संघ नऊ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पंजाबचे सात सामन्यांत तीन विजयांसह सहा गुण आहेत. पुढील चारही सामने पंजाबसाठी मोलाचे असतील. याआधीच्या सामन्यात हैदराबादने पंजाबला आपल्या मैदानावर पाच धावांनी नमविले होते.

पंजाबच्या जमेची बाजू अशी, की सलामीचा हाशिम अमला जबर फॉर्ममध्ये आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध अमलाने शतक ठोकले होते. कर्णधार ग्लेन मॅक्सवेलनेदेखील आक्रमक खेळी केली होती. परंतु भुवनेश्वर आणि कंपनीच्या माऱ्याला ते कसे सामोरे जातात ते पहावे लागेल. पंजाबकडून स्थानिक क्रिकेट खेळणारे युवराजसिंग आणि सिद्धार्थ कौल हे सनरायजर्ससाठी मोहालीच्या मैदानावर काय चमत्कार करतात, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Punjab beat Windies to strengthen the challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.